Sunday , 13 October 2024
Home FinGnyan Income Tax Return : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) म्हणजे काय?
FinGnyan

Income Tax Return : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) म्हणजे काय?

Income Tax Return (ITR) : आकडेवारी काहीही असो पण भारतातील प्रत्येक नागरिक हा प्रत्येक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कर (Tax) भरत असतो. तुम्ही साधं एक रुपयाचं चॉकलेट जरी विकत घेतलं असलं तरीही त्यावर टॅक्स लागलेला असतो. याच अर्थाने सांगायचं झालं तर भारतातील प्रत्येक नागरिक हा टॅक्स रूपात सरकारची तिजोरी भरण्यात मदत करत असतो. पण या व्यतिरिक्त सरकार सर्व व्यक्तींच्या करपात्र उत्पन्नावर टॅक्स लावते. भारताच्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या उत्पन्नावर कर भरावा लागतो. याची मर्यादा सरकारने ठरवून दिलेली आहे. तसेच टॅक्स स्लॅबनुसार ही कराची आकारणी केली जाते. त्यासाठी सरकारला म्हणजेच आयकर विभागाला उत्पन्नासह सर्व मालमत्तेची माहिती द्यावी लागते.

आयकर रिटर्न काय आहे?

इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Returns) हा असा एक फॉर्म आहे ज्यामार्फत भारतीय आयकर विभागाला तुमच्या उत्पन्नाची आणि मालमत्तेची माहिती अहवालस्वरूपात दिली जाते. यामध्ये संबंधित व्यक्तीचा पगार, व्यवसायातील नफा, घराच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न किंवा लाभांश, भांडवली नफा, व्याज किंवा इतर स्त्रोतांद्वारे मिळविलेले उत्पन्न इत्यादी बाबींचा तपशील असतो. जर आयकर विभागाला रिटर्नमध्ये असे दिसून आले की करदात्याने वर्षभरात जादा कर भरला आहे, तर त्याला आयकर विभागाकडून कर परतावा मिळतो.

इन्कम टॅक्स रिटर्न भरणे बंधनकारक आहे का?

भारतातील कर कायद्यानुसार, तुमचे उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला आयकर रिटर्न भरणे बंधनकारक आहे. करदात्यांसाठी प्राप्तिकराचा दर आधीच ठरलेला असतो. तसेच विशिष्ट तारखेपूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागतो. जर करदात्याने अंतिम मुदतीचे पालन केले नाही तर त्याला दंड भरावा लागतो.

Related Articles

A Rise of Bata Footwear : बाटा फुटवेअरचा उल्लेखनीय उदय.

A Rise of Bata Footwear : एका शतकापूर्वीच्या सुरुवातीपासून ते आजच्या जागतिक...

Wipro Industries Soaring to New Heights : विप्रो इंडस्ट्रीजची यशोगाथा

Wipro Industries Soaring to New Heights : जागतिक तंत्रज्ञान आणि वाढत्या गतिमान...

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची एक यशोगाथा

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची सुरुवात कशी झाली?...