Friday , 26 July 2024
Home Investment What is Budget? : अर्थसंकल्प म्हणजे काय? अर्थसंकल्पातील पैसा कुठून येतो व कोठे खर्च होतो? जाणून घ्या सविस्तर.
Investment

What is Budget? : अर्थसंकल्प म्हणजे काय? अर्थसंकल्पातील पैसा कुठून येतो व कोठे खर्च होतो? जाणून घ्या सविस्तर.

What is budget? : काल राज्याचे उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात अनेक महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? अर्थसंकल्प सादर करत असताना विकास कामांसाठी किंवा इतर योजनांसाठी करोडोकरोडॊ रुपयांच्या घोषणा केल्या जातात. पण या सगळ्यांसाठी राज्यसरकारकडे पैसा कुठून आणि कसा आला? आलेला पैसा सरकारने कुठे आणि कसा खर्च केला? सर्वात आधी अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय? पाहुयात…

राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे काय?

देशाच्या किंवा राज्याच्या विधान भवनात अर्थमंत्र्यांद्वारे दरवर्षी सादर केलेल्या आर्थिक प्रस्तावांना अर्थसंकल्प’ किंवा ‘बजेट’ असे म्हंटले जाते.

राज्यसरकारकडे पैसा कुठून आणि कसा आला?

दरवर्षी राज्याच्या पाटलावरती अर्थसंकल्प हा मांडला जातो. अनेक योजनेसाठी प्रत्येक विभागासाठी करोडोंचा निधी वाटला जातो. एवढा सगळा पैसा सरकारकारकडे येतो कुठून, त्यामार्फत सरकार राज्य किंवा देश चालवते? हाच मुद्दा आपण थोडक्यात आणि सोप्प्या भाषेत समजून घेऊ…

यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात ‘एवढ्या’ कोटींची तरतूद आहे. हा पैसा राज्यसरकारला खालीलप्रमाणे प्राप्त होणार आहे…

समजा राज्य सरकारला एक रुपया प्राप्त होणार आहे. हा एक रुपया कोणकोणत्या क्षेत्रातून प्राप्त होणार? समजून घ्या..

  • राज्याचा स्वतःचा कर महसूल – 50% पैसे
  • भांडवली जमा – 25% पैसे
  • केंद्रीय करातील हिस्सा 11% पैसे
  • केंद्रीय सहायक अनुदाने – 10% पैसे
  • राज्याचा स्वतःचा कराव्यतिक्त महसूल – 4% पैसे

वरील सर्व क्षेत्रातून मिळून राज्यसरकारला 1 रुपया प्राप्त होणार आहे आणि आलेला हाच 1 रुपया या आर्थिक वर्षात राज्य सरकार विविध योजनांसाठी, कामांसाठी खर्च करणार आहे.

Related Articles

Post Office Monthly Income Scheme : पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना – बचत करण्याचा एक खात्रीशीर पर्याय

Post Office Monthly Income Scheme : कमी जोखमीच्या पर्यायांमध्ये केलेली गुंतवणूक केव्हाही...

Farm Didi Food Tech Startup : महिला उद्योजक मंजरी शर्मा यांचा ‘फार्म दीदी’ फूड-टेक स्टार्टअप

Farm Didi Food Tech Startup : बचत गटातल्या महिलांना हाताशी धरून त्यांनी...

Upcoming IPOs in 2023 : भारतात 2023 मध्ये ‘हे’ IPO लाँच होऊ शकतात.

Upcoming IPOs in 2023 : मेनबोर्ड आणि SME या दोन्ही विभागांमध्ये 2023...

Benefit of Piggy Bank : Piggy Bank चा फायदा काय होतो?

Benefit of Piggy Bank : पिग्गी बँका पैसे वाचवण्याचा एक पारंपारिक मार्ग...