Wednesday , 11 September 2024
Home FinGnyan What Is Cheque? : धनादेश किंवा चेक म्हणजे काय?
FinGnyan

What Is Cheque? : धनादेश किंवा चेक म्हणजे काय?

What Is Cheque?
What Is Cheque? : Finntalk

What Is Cheque? : बँकिंग क्षेत्रात धनादेश (चेक) हा एक महत्वाचा कागद आहे.

बँकिंग व्यवस्थांमध्ये चेकचा वापर हा नियमित आणि सुरक्षित व्यवहारांसाठी केला जातो. युपीआय (UPI) किंवा इंटरनेट बँकिंगच्या (Internet Banking) आधी धनादेश म्हणजेच चेकचा (Cheque) काळ होता.

व्यावसायीक किंवा व्यक्तिगत आर्थिक व्यवहारांसाठी चेकला मोठे महत्व होते. अजूनही चेकचा वापर मोठ्या प्रमाणात होतो,

परंतु युपीआय आणि इंटरनेट बँकिंगच्या युगात चेक द्वारे होणारे व्यवहार मर्यादित राहिले आहेत.

धनादेशाद्वारे केलेला व्यवहार सुरक्षित मानला जातो, त्यामुळे व्यावसायिक किंवा कंपनांच्या आर्थिक व्यवहारांसाठी चेकचा वापर होतो.

What Is Cheque? : धनादेश किंवा चेक म्हणजे काय?

धनादेश असा कागद आहे ज्यामार्फत कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला पैसे देण्यासाठी तुम्ही बँकेला विनंती करता.

हेही वाचा : हेही वाचा : Post Office job 2023 : भारतीय डाक विभागात 30 हजारांपेक्षा अधिक जागांवरती बंपर भरती सुरु.

चेकचा वापर व्यक्तीला किंवा संस्थेला पेमेंट करण्यासाठी केला जातो. चेक सहसा दोन ते तीन कामकाजाच्या दिवसांमध्ये क्लीयर केला जातो.

पण काही वेळा काही कारणास्तव चेक जास्त वेळ रोखून धरला जाऊ शकतो.

‘हे’ लक्षात ठेवा –

मोठ्या प्रमाणात रोखीद्वारे व्यवहार करण्यापेक्षा चेकद्वारे व्यवहार करणे अधिक सोयीचे ठरते.

अनक्रॉस चेकपेक्षा क्रॉस केलेला चेक जास्त सुरक्षित असतो, कारण क्रॉस केलेला चेक फक्त बँक खात्यात जमा केला जाऊ शकतो.

क्रॉस म्हणजे अकाउंट्स पेयी (Accounts payee) म्हणजे दिलेल्या चेकमधील रक्कम ही समोरच्याच्या खात्यावर जमा करण्यासाठी केलेली विनंती.

अनक्रॉस चेकने सुद्धा व्यवहार होतात, जेव्हा असा चेक घेऊन एखादी व्यक्ती बँकेत जाते तेव्हा चेकवरील रक्कम त्याला रोखीने मिळते.

परंतु मोठ्या रकमांच्या चेकवरती डाव्या कोपऱ्यात क्रॉस करणे म्हणजेच चेक अकाउंट्स पेयी (Accounts payee) देणे जास्त संयुक्तिक.

सध्या पैसा हे तोह सबकुछ सही है..! त्यामुळे कोणतेही आर्थिक व्यवहार करताना सतर्कता नक्कीच बाळगली पाहिजे.

Related Articles

A Rise of Bata Footwear : बाटा फुटवेअरचा उल्लेखनीय उदय.

A Rise of Bata Footwear : एका शतकापूर्वीच्या सुरुवातीपासून ते आजच्या जागतिक...

Wipro Industries Soaring to New Heights : विप्रो इंडस्ट्रीजची यशोगाथा

Wipro Industries Soaring to New Heights : जागतिक तंत्रज्ञान आणि वाढत्या गतिमान...

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची एक यशोगाथा

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची सुरुवात कशी झाली?...