Tuesday , 10 December 2024
Home FinGnyan EPFO New Rule : आता खासगी नोकरी 10 वर्षे पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मिळणार पेन्शन.
FinGnyanFinNews

EPFO New Rule : आता खासगी नोकरी 10 वर्षे पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मिळणार पेन्शन.

EPFO New Rule : तुम्ही खाजगी नोकरी करत असाल तर तुम्हालाही आता सरकारी नोकरीप्रमाणे खाजगी नोकरी सोडल्यावर पेन्शन (Pension) मिळू शकते. त्यासाठी ईपीएफओ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) मध्ये खाते असणं आवश्यक आहे. ईपीएफओच्या (EPFO) नव्या नियमांनुसार, खाजगी कर्मचारीही पेन्शन मिळवू शकतात, परंतु यासाठी एक अट आहे ती पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाचं या पेन्शन योजनेचा लाभ मिळू शकतो.

EPFO पेन्शनसंबंधितचा नियम काय आहे?

ईपीएफओच्या (EPFO New Rule) नियमांनुसार, खाजगी कंपनीत काम करणारा कर्मचारीही पेन्शनचा हक्कदार होऊ शकतो. यामध्ये कर्मचार्‍यांकडून एकच अट आहे की, त्याचा नोकरीचा कालावधी 10 वर्षे पूर्ण झालेला असावा.

ईपीएफओच्या (EPFO) माहितीनुसार, कर्मचाऱ्याच्या सर्व नोकऱ्या जोडून नोकरीचा कालावधी 10 वर्ष पूर्ण असला पाहिजे, तर कर्मचाऱ्याला या पेन्शन योजनेचा मिळू शकतो. तसेच कर्मचाऱ्याला त्याचा UAN नंबर बदलावा लागणार नाही. म्हणजेच कंपनी बदलली तरीही त्याच्या 10 वर्षांच्या सेवेसाठी एकच UAN नंबर राहतो. याचे कारण म्हणजे नोकरी बदलल्यानंतरही UAN तोच राहतो आणि PF खात्यात जमा केलेले संपूर्ण पैसे त्याच UAN मध्ये परावर्तित होतील.

पेन्शन योजना कशी काम करते?

खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारातून 12 टक्के रक्कम कापून ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत टाकली जाते. कर्मचार्‍यांच्या पगारातून कापलेला संपूर्ण भाग EPF मध्ये जातो, तर नियोक्ता कंपनीचा 8.33% हिस्सा हा कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS) जातो आणि 3.67% दरमहा EPF योगदानामध्ये जातो.

Related Articles

A Rise of Bata Footwear : बाटा फुटवेअरचा उल्लेखनीय उदय.

A Rise of Bata Footwear : एका शतकापूर्वीच्या सुरुवातीपासून ते आजच्या जागतिक...

Wipro Industries Soaring to New Heights : विप्रो इंडस्ट्रीजची यशोगाथा

Wipro Industries Soaring to New Heights : जागतिक तंत्रज्ञान आणि वाढत्या गतिमान...

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची एक यशोगाथा

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची सुरुवात कशी झाली?...