Post Office : 5-वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह 3 पोस्ट ऑफिस योजना ज्या हमी परतावा देतात त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? कष्टाचा पैसा कुठे गुंतवावा हा प्रश्न सगळ्याच मध्यमवर्गीयांना पडतो. वेळेला पैसा कमी यायला हवा. केलेली गुंतवणूक सुरक्षित आणि परतावा देणारी असावी अशी सगळ्यांचीच इच्छा असते. आजकाल स्टॉक मार्केट मध्ये रोजच काही ना काही खळबळी ऐकायला येते. एखादी घटना घडते किंवा एखादा अहवाल येतो ज्याने मार्केट कोसळते. अशा वेळी, अनेकांना रिस्की असलेल्या इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करायला आवडत नाही.
पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव खाते (Recurring Deposit), पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खाते (POTD), आणि पोस्ट ऑफिस – राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) या 3 योजना आहेत. या पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये पैसे गुंतवण्याचे अनेक फायदे आहेत.
गुंतवणूकदाराला येथे गॅरंटीड रिटर्न्स म्हणजेच हमी परतावा मिळेल. ह्यातल्या दोन योजनांमध्ये कर कपातीचा लाभ देखील आहे.
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट खाते (RD) – सुरक्षित आणि गॅरंटीड रिटर्न्ससाठी हे रिकरिंग डिपॉझिट अकाउंट बऱ्याच काळापासून फेमस आहे. तुम्ही या योजनेत किमान रु. 100 प्रति महिना किंवा रु. 10 च्या पटीत कोणतीही रक्कम गुंतवू शकता. या योजनेत गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही. शालेय विद्यार्थ्यांना बचतीची सवय लावण्यात ह्या योजनेचा मोठा वाटा आहे.
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खाते (POTD) – नावाप्रमाणे स्पष्ट उद्देश असणारी ही योजना पोस्ट ऑफिस यंत्रणेत FD एफडी करण्याचा प्रकार आहे. या योजनेअंतर्गत, गुंतवणूकदार पोस्ट ऑफिसमध्ये एक, दोन, तीन किंवा पाच वर्षांसाठी ठेवी ठेवू शकतो. जर चांगला परतावा म्हणजे चांगले रिटर्न्स यावेत ह्यासाठी तुम्ही एखादी FD स्कीम शोधत असाल तर 5 वर्षांसाठी पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवले पाहिजेत. ह्या योजनेत आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत आयकर सवलतीचा लाभ मिळू शकतो.
पोस्ट ऑफिस – राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) – पोस्ट ऑफिस NSC योजना 5 वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह येते. अनेक वर्षांपासून विविध जाहिरातीद्वारे अनेक ग्राहक जोडण्यात ही योजना यशस्वी झालेली आहे. या योजनेअंतर्गत, किमान रु. 1000 आणि रु. 100 च्या पटीत गुंतवणूक करता येते. ठेवीसाठी कमाल मर्यादा नाही. ही योजना तुम्हाला 5 वर्षांचा लॉक-इन कालावधी पूर्ण झाल्यानंतरच पैसे काढता येतात. सदरील स्कीम मध्ये देखील आयकरात सवलत मिळते.