Richest people who come from Nothing : जगात सहज साध्य असे काही नसते. प्रयत्न करून अनेकदा हार पत्करून पुन्हा धडक मारणाऱ्या मंडळींनीच यश मिळते.
जगातल्या काही दिग्गज लोकांनी मिळवलेले यश हे एका रात्रीत मिळवले नाही. अनेकदा धडक मारून अपयश मिळवून देखील त्यांनी यश संपादन केले आहे.

ह्यासाठी खचून न जात त्यांनी पुन्हा त्याच वाटेवर आधीच्या चुका टाळून नव्याने मार्गक्रमण केले.
Richest people who come from Nothing : काही यशस्वी माणसे जी नेहमी कुतूहलाचा विषय बनली आहेत.
हॅरी पॉटर लेखिका जे.के. रोलिंग :
जे.के. रोलिंग ह्यांचे “हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन” साठीचे हस्तलिखित ब्लूम्सबरी पब्लिकेशनने स्वीकारण्यापूर्वी अनेक प्रकाशकांनी नाकारले होते.
तरीही खचून न जात त्यांनी प्रकाशकांना भेटणे सुरु ठेवले.
12 पब्लिशर्सचा नकार पचवल्यावर शेवटी 13व्या प्रकाशकाने पहिले पुसत प्रकाशित केले आणि नंतर जो घडला तो इतिहास.
हॅरीपॉटर ही मालिका इतिहासातील सर्वाधिक विकली जाणारी पुस्तक मालिका बनली.
स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वोझ्नियाक (Apple Inc).:
ऍपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वोझ्नियाक यांनी त्यांचे संगणक डिझाइन हेवलेट-पॅकार्ड (HP) आणि अटारी यांना ऑफर केले होते.
दोघांनी नव्या आधुनिक संगणकाची ही कल्पना नाकारली. मात्र नन्तर त्यांनी Apple Computers लाँच केलं जे नंतर Apple Inc. बनले.
जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक. आज Apple ची घॊडदौड तुफानी आहे.
Richest people who come from Nothing : द बीटल्स
गाणी म्हणणारा एक ब्रिटिश बँड. प्रसिद्धी मिळवण्याआधी, बीटल्सला डेक्का रेकॉर्ड्सने नाकारले होते.
त्यांनी EMI च्या Parlophone लेबलवर स्वाक्षरी केली आणि संगीत इतिहासातील सर्वात प्रभावशाली बँड बनले.
गाणी म्हणून प्रसिद्धी मिळत नसते… अश्या प्रकारच्या टीकेला सामोरे जाऊन पुन्हा भरारी घेणारा बीटल बँड अजूनही अनेकांची प्रेरणा आहे.
Richest people who come from Nothing : वॉल्ट डिस्ने
त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात, वॉल्ट डिस्नेला सर्जनशीलता आणि ओरिजिनल कल्पना नसल्यामुळे वृत्तपत्र कंपनीतून काढून टाकण्यात आले.
काही वर्षांनी वॉल्ट डिस्ने ह्यांनी जागतिक स्तरावरील सर्वात प्रतिष्ठित ओरिजिनल आणि मनोरंजन करणारी कंपनी तयार केली.
स्टार वॉर्सचा जॉर्ज लुकास :
जॉर्ज लुकासला त्याचा मूळ “स्टार वॉर्स” चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करताना विविध स्टुडिओमधून असंख्य नकारांचा सामना करावा लागला.
अखेरीस, 20th Century Fox ने या चित्रपटाची संधी घेतली, ज्याने प्रचंड यश मिळवले आणि सिनेमाच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय फ्रँचायझींपैकी एक बनले.
Richest people who come from Nothing : जेफ बेझोस (Amazon.com)
जेफ बेझोस यांनी पहिल्यांदा Amazon सुरू केले तेव्हा त्यांनी त्यांची कल्पना अनेक गुंतवणूकदारांसमोर मांडली.
सर्वानीच त्यांना नकार दिला. आता, Amazon ही जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स आणि तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे.
UBER :
जगातली App based टॅक्सी सर्व्हिस असणारी लोकप्रिय कंपनीला सुरुवातीच्या काळात जवळपास 500 गुंतवणूकदारांनी नाकारले होते.
आज जगभर आपले पाय रोवून ग्राहकांना सर्व्हिस देणारी कम्पनी बनली आहे.
ही केवळ काही उदाहरणे आहेत. आपण प्रेरणा घेऊन सातत्याने काम करत राहिल्याने यश आपल्या पायाशी लोळण घेते.