Bank Holidays in August 2023 : बँकांची काही कामे असतील तर ते वेळेत पूर्ण करा किंवा बँकांच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक पाहून कामाचे नियोजन करा.
कारण आरबीआयने (RBI) दिलेल्या माहितीनुसार या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट 2023 मध्ये भारतीय बँकांना तब्बल 14 दिवस सुट्ट्या असणार आहेत.
बँकांच्या सुट्ट्या या राज्यांनुसार व तेथील स्थानिक सणांनुसार वेगवेगळ्या असू शकतात.
जवळपास अर्धा महिना सुट्ट्यांचाच
यंदाचा अर्धा ऑगस्ट महिना सुट्यांचाच असणार आहे. कारण या महिन्यात 15 ऑगस्ट, शनिवार-रविवार, जयंती आणि सणवार यामुळे जवळपास अर्धा महिना बँकांना सुट्टीच (Bank Holidays) असणार आहे.
म्हणून बँकांच्या सुट्ट्या पाहूनच कामाचे नियोजन केलेलं सोयीस्कर ठरेल.
हेही वाचा : This rules will change from 1 August 2023 : ऑगस्टपासून ‘या’ नियमांत बदल होणार.
या ऑगस्ट 2023 मध्ये कोणकोणत्या दिवशी बँका (Bank) बंद असणार आहेत? जाणून घेऊयात ऑगस्ट 2023 महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांचे संपूर्ण वेळापत्रक :
Bank Holidays in August 2023 : ऑगस्ट 2023 मधील बँकांच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक –
6 ऑगस्ट 2023 : रविवार
8 ऑगस्ट 2023 : तेंडोंग ल्हो रम फाट्यामुळे गंगटोकमधील बँकांना सुट्टी असणार.
12 ऑगस्ट 2023 : महिन्याचा दुसरा शनिवार
13 ऑगस्ट 2023 : रविवार
15 ऑगस्ट 2023 : स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देशातील बँका बंद असणार.
16 ऑगस्ट 2023 : मुंबई, नागपूर आणि बेलापूरमध्ये पारशी नववर्षानिमित्त बँका बंद राहतील.
18 ऑगस्ट 2023 : श्रीमंत शंकरदेव तिथीमुळे गुवाहाटीमधील बँका बंद राहतील.
20 ऑगस्ट 2023 : रविवारी
26 ऑगस्ट 2023 : महिन्याचा चौथा शनिवार
27 ऑगस्ट 2023 : रविवार
28 ऑगस्ट 2023 : पहिल्या ओणममुळे कोची आणि तिरुवनंतपुरममधील बँकांना सुट्टी असणार आहे.
29 ऑगस्ट 2023 : तिरुओनममुळे तिरुअनंतपुरम आणि कोची येथील बँकांना सुट्टी असणार आहे.
30 ऑगस्ट : रक्षाबंधन निमित्त राज्यासह देशातील बँकांना सुट्टी असणार आहे.
31 ऑगस्ट 2023 : रक्षाबंधन / श्री नारायण गुरु जयंती / पंग-लबसोल या सणांमुळे डेहराडून, गंगटोक, कानपूर, कोची, लखनौ आणि तिरुअनंतपुरम या शहरांमधील बँकांना सुट्टी असेल.
एकंदरीत बँका बंद असल्या तरीही तुम्ही बँकांच्या ऑनलाईन (Online Banking) सेवेचा फायदा घेऊ शकता. बँकांच्या या सेवा 24 तास सुरु असतात. त्यामुळे बँका बंद असल्या तरीही ग्राहकांना जास्त अडचणींचा सामना करावा लागत नाही.