Retirement Planning : अर्थनियोजनात म्हणजे फायनान्शिअल प्लॅनिंगमध्ये सर्वात महत्वाचा पण तसा दुर्लक्षित राहणारा भाग म्हणजे रिटायरमेन्ट साठी करायचे नियोजन.
बऱ्याचदा दुर्लक्ष होते कारण,आयुष्यातला महत्वाचा कालावधी शिक्षण आणि नंतर सेटल होण्यात जातो. त्यानंतरचा कालावधी EMI आणि बाकी गुंतवणुकीत जातो.
मधल्या काळात घेतलेल्या प्रॉपर्टी, आजारपणे, मुलांची शिक्षणे आणि त्यावरील खर्च हा एकदम आयुष्यात येऊ शकतो.
ह्या सगळ्यात निम्मे आयुष्य निघून गेल्यावर रिटायरमेंटकडे लक्ष जाते आणि नंतर लक्षात येते की आपण उत्तर आयुष्यासाठी फार काही तरतूद केलेली नाही.
Retirement Planning : रिटायरमेन्ट प्लॅनिंगची सुरुवात कधी करावी?
साधारण रिटायरमेन्ट प्लॅनिंगची सुरुवात कधी करावी असा प्रश्न सर्वाना पडणे साहजिक आहे.
कोणता काळ रिटायरमेंट प्लॅनिंग करण्यासाठी उत्तम ह्याचे ठोक असे उत्तर नाही. सरकारी कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट नंतर पेन्शन योजना असते.
पण गेल्या काही काळात सरकारने ती योजना पण मागे घेतली आहे. त्यामुळे आता प्रत्येक माणसाला निवृत्तीनंतरची सोयआधीच करून ठेवणे क्रमप्राप्त आहे.
रिटायरमेंट नंतरच्या नियोजनासाठी महत्वाच्या टिप्स –
साधारणपणे खाली 5 महत्वाच्या टिप्स रिटायरमेंट नंतरच्या नियोजनासाठी अनेकदा दिल्या जातात.
रिटायरमेन्ट च्या नियोजनाला लवकर सुरुवात करावी.
गुंतवणुकीचे विविध पर्याय निवडून त्यात पैसे गुंतवावे.
भविष्यातील गरजांचा विचार आणि महागाईवाढीचा दर लक्षात घेऊन त्यानुसार वाढीव गुंतवणूक करण्याचे नियोजन करावे.
खर्च आणि कमाई ह्याचे गुणोत्तर चुकणार नाही असे नियोजन सुरुवातीपासून असावे.
एका इन्कम सोर्स वर अवलंबून न राहता अतिरिक्त इन्कम सोर्स शोधावे, तसेच केलेल्या इन्व्हेस्टमेंटचा रिव्ह्यू वेळोवेळी घ्यावा.