Saturday , 25 May 2024
Home FinGnyan Five Principles of Financial Planning : आर्थिक नियोजनासंबंधी काही महत्वाच्या बाबी; जाणून घेऊयात अर्थनियोजनाची पंचसूत्री.
FinGnyan

Five Principles of Financial Planning : आर्थिक नियोजनासंबंधी काही महत्वाच्या बाबी; जाणून घेऊयात अर्थनियोजनाची पंचसूत्री.

Five Principles of Financial Planning : पैसे कमावणे हाच प्रत्येक व्यक्तीचा शिक्षण करत असल्यापासूनचा पहिला हेतू असतो. नोकरी की धंदा हा विचार करत असताना पैसे मिळतील आणि त्याची व्यवस्थित कुठेतरी गुंतवणूक केली जाईल अशीच शिकवण मिळत आलेली असते. आयुष्यातला व्यावहारिक आर्थिक गुंता वाढायला लागला की मानसिक शारीरिक आरोग्य गडबडायला लागते. म्हणूनच सर्वच बाबतीत नियोजन जास्त जरुरी आहे. नोकरी लागली की पहिल्या महिन्यापासून आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. आलेले पैसे योग्य जागी गुंतवणे आणि खर्चांवर नियंत्रण कसे ठेवायचे हे शिकून घेणे आवश्यक आहे.

Five Principles of Financial Planning

आपल्यापैकी अनेकांना जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींसाठी एक फिक्स असा दृष्टीकोन असतो. करिअरपासून ते नवीन घर खरेदी करण्यापर्यंत, आपण सर्वच जण आपले आर्थिक नियोजन (Financial Planning) कोणत्या ना कोणत्या मार्गाने करीत असतो. याशिवाय, आयुष्यात कोणत्याही वेळी उद्भवू शकणाऱ्या अनिश्चिततेसाठी म्हणजे अघटित गोष्टीसाठी आपण नेहमी तयार राहिले पाहिजे.

जर तुम्ही पगारदार असाल, तर तुम्हाला महिन्याच्या शेवटच्या दिवसात बहुतेकांना असा भयावह विचार येतो की सर्व पैसे गेले कुठे? स्वतःसाठी सशक्त आर्थिक व्यवस्था तयार करण्यासाठी, तुमच्या मनात एक सशक्त आर्थिक योजना असणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे जर तुम्ही पगारी जीवन जगत असाल म्हणजे नोकरदार असाल तर निश्चित अशी आर्थिक योजना आखणे आवश्यक आहे. ह्यामुळे महिनाअखेरीस कडकी नाही येणार. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला पगार मिळताच अनेक जण पैसे वाचविण्यावर भर देतात. पगार आल्याबरोबर लगेचच सेव्हिंग रिलेटेड गोष्टीत पैसे ट्रान्सफर करून मगच घराचे मासिक बजेट आखणे अनेकांना आवडते.

काही महत्वाच्या बाबी ज्या सरसकटपणे नियोजनासाठी वापरल्या जातात त्यावर आपण नजर टाकूयात.

  1. महिन्याच्या खर्चाचे बजेट हे गरजा, आवश्यकता आणि बचत ह्यानुसार करावे.
  2. विमा म्हणजे इन्शुरन्सविषयक बचत त्या नंतर करावी.
  3. कुणाची काही हातउसनी रक्कम देणे असेल किंवा काही कर्ज असले तर ते फेडले पाहिजे
  4. ह्या नंतर वैयक्तिक बचतीचे जसे की मुलांचे शिक्षण अन भविष्य ह्यासाठी जे ध्येय निश्चित केलेले आहे त्यानुसार बचत करावी.
  5. ह्या सगळ्यानंतर रिटायरमेंट संबंधी जी तरतूद करून ठेवायची आहे त्यानुसार बचतीचे मार्ग आपलेसे करणे.

पुढील लेखात रिटायरमेंट प्लॅनिंग करणे कसे गरजेचे आहे ह्यावरील माहिती पाहुयात.

Related Articles

A Rise of Bata Footwear : बाटा फुटवेअरचा उल्लेखनीय उदय.

A Rise of Bata Footwear : एका शतकापूर्वीच्या सुरुवातीपासून ते आजच्या जागतिक...

Wipro Industries Soaring to New Heights : विप्रो इंडस्ट्रीजची यशोगाथा

Wipro Industries Soaring to New Heights : जागतिक तंत्रज्ञान आणि वाढत्या गतिमान...

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची एक यशोगाथा

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची सुरुवात कशी झाली?...