Financial Analyst : वित्तीय विश्लेषक म्हणजे Financial analysts. ही फायनान्शिअल अनॅलिस्ट मंडळी फायनान्शिअल डेटाचे विश्लेषण करून आणि गुंतवणूक करण्यासाठीच्या निर्णयांना बळकटी देण्यासाठी नेमका सल्ला देऊन वित्तीय कंपन्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
वित्तीय विश्लेषक यांच्या कामाच्या प्राथमिक जबाबदाऱ्यांमध्ये खालील गोष्टी येतात –
आर्थिक विश्लेषण (Financial Analysis) :
वित्तीय विश्लेषक कंपन्या, उद्योग आणि गुंतवणुकीच्या संधींच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी फायनान्स मॉडेल आणि विश्लेषण साधने वापरतात.
वरिष्ठ व्यवस्थापनाला गुंतवणुकीच्या शिफारसी करण्यासाठी फायनान्शिअल स्टेटमेन्ट, हिस्टोरिकल डेटा आणि बाजारातील सध्याच्या ट्रेंडचे विश्लेषण करतात.
हेही वाचा : खासगी कंपनीतून सॅलरी घेणाऱ्या प्रत्येकाला ‘हे’ पाच नियम माहित असायला हवे!
गुंतवणूक संशोधन (Investment Research) :
आर्थिक विश्लेषक हे स्टॉक, बाँड आणि इतर आर्थिक साधनांसह संभाव्य गुंतवणूक ऑप्शन्सवर संशोधन करतात.
डीटेल्ड माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेण्यासाठी बाजार परिस्थिती, उद्योग कल आणि कंपनीच्या कामगिरीचे मूल्यांकन करतात.
जोखीम मूल्यांकन (Risk Calculation) :
वेगवेगळ्या गुंतवणुकीशी संबंधित जोखमींचे देखील मूल्यांकन आर्थिक विश्लेषक करतात आणि रिस्क मॅनेजमेंट करण्यासाठी धोरणांची (Policy) शिफारस करतात.
‘संभाव्य जोखीम’ ओळखण्यासाठी (Risk Identification) आणि ‘जोखीम व्यवस्थापन’ (Risk Management) योजना विकसित करण्यासाठी ते सांख्यिकीय (Statistical) मॉडेल, आणि इतर विश्लेषणात्मक साधने वापरतात.
अहवाल आणि सादरीकरणे :
फायनान्शिअल रिपोर्ट्स आणि प्रेझेंटेशन्स हे दोन महत्वाची कामे फायनान्शिअल अनॅलिस्ट निष्कर्ष आणि शिफारसी हायलाइट करून वरिष्ठ व्यवस्थापन आणि गुंतवणूकदारांसाठी तयार करतात.
गुंतवणुकीच्या कामगिरीबद्दल अपडेट्स देण्यासाठी आणि प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ते ग्राहक आणि इतर भागधारकांशी संवाद साधतात.
एकंदरीत, फायनान्शिअल अनॅलिस्ट हे पद वित्तीय क्षेत्रात गुंतवणूक आणि आर्थिक निर्णय घेण्यासाठी आवश्यक माहिती आणि आवश्यक दृष्टिकोन निर्माण करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.