Currency Printing : नुकतीच शाहिद कपूर ह्या अभिनेत्याची फर्जी ही वेबसिरीज अनेकांनी आवडली म्हणून सांगितली. नकली नोटांचा संदर्भ सदरील मालिकेत दिला गेला आहे. आपल्या देशात भारतीय रिझर्व्ह बँकेवर (RBI) चलनाचे उत्पादन करण्याची जबाबदारी आहे. चलनाची मागणी, आर्थिक परिस्थिती आणि चलन बदलण्याची गरज यासह अनेक घटकांवर आधारित चलनाचे मूल्य आणि चलन छापण्याचे प्रमाणसुद्धा RBI ठरवते.
रिझर्व्ह बँकेने जेंव्हा चलन छापण्याचे प्रमाण ठरवते तेंव्हा अर्थव्यवस्थेची स्थिती, चलनवाढ, व्याजदर आणि चलनाचा विनिमय दर यासारखे विविध घटक विचारात घेते. चलन निर्मितीच्यावेळी बनावट चलन निर्मिती रोखण्यासाठी चलनाच्या सुरक्षा वैशिष्ट्यांचा प्रत्येकवेळी विचार केला जातो.
येथे होते चलन छपाई –
आरबीआयमधील चलन व्यवस्थापन विभाग चलनी नोटा आणि नाण्यांच्या छपाई, वितरण आणि ऑपरेशन्स ह्यावर देखरेख करतो. नाशिक, देवास, म्हैसूर आणि सालबोनी येथील चार करन्सी प्रेसमध्ये चलनी नोटांची छपाई करण्यात येते. चलनाचे सुरळीत ऑपरेशनल गोष्टी पार पाडण्यासाठी RBI कडे देशभरात करन्सी चेस्ट आणि कॉईन व्हॉल्टचे नेटवर्क आहे. चलनातल्या नोटा चापट असताना, देशातली चलनाची मागणी, अर्थव्यवस्थेची स्थिती आणि देशाच्या GDP ची वाढ ह्यासारख्या घटकांचा RBI विचार करते.
RBI समोर बनावट चलन रोखणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. वेळोवेळी चलन सुरक्षेचा आढावा घेऊन त्यासंदर्भात उपाययोजना करत राहणे ह्या RBI च्या कार्यप्रणालीचा एक भाग आहे. तरीही आपल्या देशात बनावट चलन सापडतात. परंतु डिजिटल पेमेंट व्यवस्था मोठ्याप्रमाणात स्वीकारली गेली असल्याने रोखीचे व्यवहारा तसे कमी होण्यास सुरुवात झालेली आहे.