Credit Suisse Bank : आख्खे जग आता 2008 सारख्या जागतिक महामंदीकडे चाललंय की काय असं वाटायला लागलं आहे. जगभरातील मुख्यतः अमेरिका आणि युरोपीय बँकिंग क्षेत्रात मंदी (A recession in the Banking sector) आली आहे. ह्या मंदीमुळे अमेरिकेतील काही मोठ्या व लहान बँका मोडकळीस आल्या आहेत. याचा मोठा फटका उद्योग क्षेत्रांना बसत आहे. आता अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँकेची (SVB) बातमी ताजी असताना युरोपातील 167 वर्ष जुनी असलेली मोठी बँक ‘क्रेडिट सुईस’ (Credit Suisse) ही धोक्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे.
बँकेची होणार विक्री –
स्वित्झर्लंडमधील क्रेडिट सुईस (Credit Suisse) ही बँक सध्या आर्थिक संकटात सापडली आहे. क्रेडिट सुईस बँक ही स्वित्झर्लंडमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक आहे. सध्या ही बँक तुफान तोट्यात आहे. त्यात शेअर होल्डर मोठ्या प्रमाणात शेअर्स विकत असल्याने बँक आणखी डबघाईला आली आहे. त्यामुळे आता ही बँक विकली जाणार आहे. तसेच या बँकेचा विक्रीचा व्यवहार देखील पूर्ण होत आला असून UBS ने क्रेडिट सुईस बँक विकत घेतली आहे. हा करार 3 अब्ज स्विस फ्रँक्स म्हणजेच 3.2 अब्ज डॉलर्सचा असेल.
यूबीएसला स्विस नॅशनल बँक करणार मदत –
यूबीएसला ‘क्रेडिट सुईस’ (‘Credit Suisse’) ही बँक खरेदी करण्यासाठी स्विस नॅशनल बँक मदत करणार आहे. स्विस नॅशनल बँक यूबीएसला 10,000 कोटी स्विस फ्रँकची मदत करणार आहे. याशिवाय क्रेडिट सुईस (‘Credit Suisse’) खरेदी करताना झालेल्या नुकसानीसाठी 900 कोटी स्विस फ्रँक देण्याची गॅरंटीही दिली आहे. ही भरपाई स्विस सरकारकडूनच देण्यात येणार आहे. म्हणजेच या व्यवहारात स्विस सरकार देखील यूबीएसच्या पाठीशी उभा असणार आहे.
शेअर्स मध्ये 30 टक्क्यांनी वाढ –
युरोपातील 167 वर्ष जुनी असलेली मोठी बँक ‘क्रेडिट सुईस’ ही धोक्यात आल्याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर बँक मोठी संकटात सापडली होती. तसेच बँकेच्या गुंतवणूक दारांमध्येही मोठी अस्थिरता दिसून आली होती. याकाळात शेअर होल्डर्सनी मोठ्या प्रमाणात शेअर्सची विक्री केल्यामुळे ‘क्रेडिट सुईस’च्या शेअरच्या किमतीत घट झाली होती. त्यानंतर आता यूबीएस ‘क्रेडिट सुईस’ ही बँक सरकारच्या पाठिंब्याने खरेदी करीत असल्यामुळे शेअर्सच्या किमतीत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
बँकेचा 167 वर्ष जुना इतिहास –
क्रेडिट सुईस या बँकेची स्थापना सन 1856 या साली जोहान हेनरिक, अल्फ्रेड एस्चर, आणि वॉन ग्लास यांनी केली होती. पण पाहिला गेलं तर याचं श्रेय मुख्यतः अल्फ्रेड एस्चर यांनाच दिल जात. तसेच अल्फ्रेड एस्चर यांना आधुनिक स्वित्झरलँडचा जनक देखील म्हटलं जात. यासोबतच अल्फ्रेड एस्चर यांची स्वित्झरलँडला कृषिप्रधान देशापासून सर्वसंपन्न देश बनविण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती.