Wednesday , 12 June 2024
Home FinGnyan Pan card : पॅनकार्ड इनऍक्टिव्ह झालं तर काय होईल…
FinGnyan

Pan card : पॅनकार्ड इनऍक्टिव्ह झालं तर काय होईल…

Pan card : केंद्र सरकारने आर्थिक व्यवहारांसाठी सर्वत्र पॅनकार्ड (Pan card) सक्तीचं केलं आहे. म्हणजेच कोणतेही आर्थिक व्यवहार करायचे असल्यास त्याला आपला किंवा संस्थेचा पॅनकार्ड नंबर (Pan card Number) अटॅच असावा लागतो. एवढंच नाही आता तर जमिनीच्या व्यवहारांसाठी देखील पॅनकार्ड बंधनकारक (PAN Card Mandatory) केलं आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार यामुळे होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहारांना आळा बसू शकतो. त्यामुळे बँकेच्या खात्यापासून तर आधारकार्ड पर्यंत पॅनकार्ड लिंक असणे आवश्यक आहे. हे सगळं ठीक आहे पण जर पॅनकार्डच इनऍक्टिव्ह असेल तर… पॅनकार्ड इनऍक्टिव्ह झालं तर काय होईल? (What happens if PAN card becomes inactive?)

पॅनकार्ड इनऍक्टिव्ह झालं तर काय होईल?

पॅनकार्ड इनऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला अनेक महत्वाचे आर्थिक व्यवहार करता येणार नाही.

पॅनकार्ड इनऍक्टिव्ह झालं तर…

 • 1) तुम्हाला कोणतेही आर्थिक व्यवहार करताना अडचणी येऊ शकतात.
 • 2) तुम्हाला 5 लाखांपेक्षा जास्त किमतीचं सोनं खरेदी करता येणार नाही.
 • 3) म्युचअल फंड तसेच यांसारख्या वित्तीय योजनांमध्ये गुंतवणूक करता येणार नाही.
 • 4) बँकेतून 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता किंवा भरता येणार नाही.
 • 5) सरकारी योजनांचा लाभ घेताना अडचणी येऊ शकतात.
 • 6) पॅनकार्ड इनऍक्टिव्ह झालं तर ITR (Income Tax Return) भरता येणार नाही.

पॅनकार्ड इनऍक्टिव्ह झालं तर तुम्हाला एवढ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकत. ऐनवेळेस तुम्हाला तुमची होणारी नाचक्की टाळायची असेल तर पॅनकार्ड स्टेटस चेक करत राहणं आवश्यक आहे. पॅनकार्ड ऍक्टिव्ह आहे कि नाही हे तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स नुसार तपासू शकता.

पॅनकार्ड ऍक्टिव्ह आहे कि नाही हे कसं तपासायचं?

 • 1) पॅनकार्ड ऍक्टिव्ह आहे कि नाही हे तपासण्यासाठी सर्वप्रथम आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in/home या ई-फाईलिंग वेबसाइट वर जा.
 • 2) समोर ओपन झालेल्या पेजच्या डाव्या बाजूला “व्हेरिफाय युअर पॅन डिटेल्स” या लिंकवर क्लिक करा.
 • 3) त्यानंतर त्यात पॅन नंबर आणि पॅन कार्डवर असलेले नाव भरा.
 • 4) नाव नंबर भरल्यानंतर कॅप्चा कोड भरून “सबमिट” बटणावर क्लिक करा.
 • 5) तुमचं पॅनकार्ड पॅनकार्ड ऍक्टिव्ह आहे कि नाही हे स्टेटस लगेच तुम्हाला समोर दिसेल.

तर पॅनकार्ड निष्क्रिय होणार…

प्राप्तिकर कायदा (Income Tax Act), 1961 च्या कलम 139A नुसार जर तुमचे पॅनकार्ड जर आधारकार्डशी लिंक नसेल, तर तुमचं पॅनकार्ड 1 एप्रिल 2023 पासून निष्क्रिय होणार आहे. तसेच तुम्हाला आर्थिक दंड देखील बसू शकतो.

Related Articles

A Rise of Bata Footwear : बाटा फुटवेअरचा उल्लेखनीय उदय.

A Rise of Bata Footwear : एका शतकापूर्वीच्या सुरुवातीपासून ते आजच्या जागतिक...

Wipro Industries Soaring to New Heights : विप्रो इंडस्ट्रीजची यशोगाथा

Wipro Industries Soaring to New Heights : जागतिक तंत्रज्ञान आणि वाढत्या गतिमान...

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची एक यशोगाथा

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची सुरुवात कशी झाली?...