Friday , 10 May 2024
Home Startups About Byju’s : Byju’s विषयी थोडेसे…
Startups

About Byju’s : Byju’s विषयी थोडेसे…

About Byju's
About Byju's : Finntalk

About Byju’s : आज 2023 मध्ये भारत तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या मोजक्या राष्ट्रांपैकी एक राष्ट्र आहे.

शैक्षणिक क्षेत्रात देखील भारताने तंत्रज्ञान आणून एक आमूलाग्र बदल घडवला आहे. EdTech कम्पनी म्हणजे शिक्षण क्षेत्रातली तंत्रज्ञान कंपनी.

आपल्याला बायजुहे नाव आता चांगलं परिचित झालं आहे. बायजू ही एक शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनी आहे.

आकर्षक आणि वैयक्तिकृत डिजिटल शिक्षण प्रणाली विकसित करून विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धतीत Byjus ने क्रांती घडवून आणली आहे.

About Byju’s : बायजूबद्दल थोडसं जाणून घेऊयात…

बायजूची कथा 2011 मध्ये सुरू होते. बायजू रवींद्रन नामक एक व्यक्ती जी उत्तम शिक्षक आणि उद्योजक आहे.

यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यास मदत करण्यासाठी ऑफलाइन वर्ग आयोजित करण्यास म्हणजे क्लासेस घेण्यास सुरुवात केली.

हेही वाचा : PM Modi US Visit : मोदींसाठी आयोजित केलेल्या स्टेट डिनर मध्ये कोण-कोणते दिग्गज आले होते?

बायजू ह्यांची शिकवण्याची पद्धत आणि अवघड अश्या संकल्पना सोप्या करून सांगण्याच्या पद्धतीमुळे ते विद्यार्थ्यांमध्ये त्वरीत लोकप्रिय झाले.

शिक्षणातील तंत्रज्ञानाची क्षमता ओळखून, बायजू आणि त्यांच्या टीमने एक मोबाइल लर्निंग App विकसित केले.

ह्या App च्या माध्यमातून पुस्तकातले धडे व्हिडिओ माध्यमात आणि सोप्या प्रकारे समजवून सांगतील अश्या पद्धतीने मिळायला लागले. आणि ह्याचमुळे डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म म्हणून बायजूची सुरुवात झाली.

About Byju’s : बायजू ठरलं हिट…

Byju चे हे App झटपट हिट ठरले. संपूर्ण भारतातील लाखो विद्यार्थ्यांना ह्या Appने आकर्षित केले.

इमर्सिव्ह व्हिज्युअल्स आणि गेमिफाइड क्विझसह उच्च-गुणवत्तेची सामग्री एकत्रित करून शिकण्याची प्रक्रिया सुलभ आणि सोपी व हवीहवीशी केली गेली.

हळूहळू शालेय शिक्षण व्यतिरिक्त विविध शैक्षणिक विषयांसाठी आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी सर्वसमावेशक अभ्यास साहित्य उपलब्ध करून द्यायला बायजूने सुरुवात केली.

कंपनीचा आंतराष्ट्रीय प्रवास सुरु :

जसजसे बायजू वाढत गेले, तसतसे त्याने भारताच्या सीमेपलीकडे आपला विस्तार वाढवला. कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश केला.

जगभरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणप्रणालीनुसार शिक्षण App ऑफर केले गेले. हळूहळू Byju ने जागतिक ओळख मिळवली.

आणि मग मार्क झुकरबर्ग आणि चॅन-झकरबर्ग ह्यांच्याकडून गुंतवणूक देखील मिळवली.

App व्यतिरिक्त, Byju ने नवीन शैक्षणिक उत्पादने आणि सेवा सादर केल्या आहेत. Byju च्या क्लासेसने थेट ऑनलाइन शिकवणी द्यायला सुरुवात केली.

ह्यागोष्टीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांशी रिअल-टाइममध्ये संवाद साधता येतो. Byju ने Mathway आणि Osmo सारखे शैक्षणिक प्लॅटफॉर्म देखील मिळवले.

Bujy हे भारतातील पहिले एडटेक युनिकॉर्न-Edtech Unicorn बनले :

दर्जेदार शिक्षणाप्रती बायजूची वचनबद्धता सिद्ध झाल्याने अनेक पुरस्कार आजवर Byju ने मिळवले आहेत.

Bujy हे भारतातील पहिले एडटेक युनिकॉर्न-Edtech Unicorn बनले. त्यांचे एकूण बाजार मूल्य $1 बिलियन पेक्षा जास्त आहे.

Byju ने प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार वैयक्तिकृत शिक्षण Personalised Learning हा अनुभव वितरीत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग अल्गोरिदम ह्या दोन महत्वाच्या गोष्टीचा समावेश करून त्यांचे App अपटुडेट ठेवायला सुरुवात केली आहे.

आज, 170 हून अधिक देशांतील लाखो विद्यार्थ्यांना सेवा देत, Byju’s Edtech मध्ये जागतिक आघाडीवर आहे. शिकणे आनंददायक आणि परिणामकारक बनवण्याचे बायजूचे ध्येय हे त्यांच्या यशाच्या केंद्रस्थानी आहे.

Related Articles

My Mandi Startup : भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी..

My Mandi Startup : भाजी आपल्या सोयीच्या वेळेत घरी डिलिव्हर व्हावी, ती...

Butt Baby Carrier : आकाश आणि रुची ह्या दाम्पत्याचा अनोखा स्टार्टअप

Butt Baby Carrier : आकाश आणि रुचीला असं लक्षात आलं की भारतातले...

Hypothalamus : Healthy meal delivery service : पेशंट हीच गिऱ्हाईकं

Hypothalamus : Healthy meal delivery service : डाएट हीच आयडिया घेऊन मुंबईत...

The History Of Reliance Industry : रिलायन्स इंडस्ट्रीज – शुन्यापासून ते वर्चस्वापर्यंतचा प्रवास.

The History Of Reliance Industry : रिलायन्स इंडस्ट्रीज - शुन्यापासून ते वर्चस्वापर्यंतचा...