Vehicle Insurance : बाबू समझो इशारे हॉर्न पुकारे पम्पम्पम….. दुचाकी असो की चारचाकी प्रत्येकाची एक नजाकत असते. रोज गाडी धुणे, पुसणे, वापरताना काळजीपूर्वक वापरणे हा ज्याचा त्याच्या प्रेमाचा भाग असतो. मग ती साधी दुचाकी असो की मोठा ट्रक. आपल्या वाहनावर/गाडीवर प्रेम असलेले आपण अनेकजण पाहतो. गादीवर प्रेम करणे म्हणजे रोज स्वच्छ ठेवणे इतकेच नव्हे तर तिची वेळोवेळी देखभाल करणे, सर्व्हिसिंग वेळेत करणे आणि मुख्य म्हणजे विहित मुदतीत तिचा वार्षिक विमा करणे. विमा ही जरी आग्रह विषयक वस्तू असली तरी ती किती आवश्यक आहे ह्याची वेगळ्याने माहिती करून देण्याची आवश्यकता नाही.
व्हेईकल इन्शुरन्स काय आहे?
व्हेईकल इन्शुरन्स म्हणजेच मोटार विमा हा बाजारात उपलब्ध असलेल्या इतर विमा पॉलिसींप्रमाणेच आहे. भारतात सर्व प्रकारच्या वाहन मालकांसाठी वाहनविमा म्हणजे मोटार इन्शुरन्स असणे आवश्यक आहे. बाईक असो वा स्कुटर, कार असो वा रिक्षा, ट्रक असो की ट्रॅक्टर सर्व प्रकारची दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, मल्टीव्हील व्हेइकल्स सगळ्यांना विहित असलेला विमा उतरवणे बंधनकारक आहे.
हेही वाचा : Chief Ministers Of Indian States : कोणत्या राज्याचे कोण मुख्यमंत्री?
व्हेईकल इन्शुरन्स बंधनकारक –
वाहन मालकाच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने व्हेईकल इन्शुरन्स / मोटार विमा बंधनकारक केला आहे. पण खास बाब म्हणजे मोटार विमा प्रकारातल्या विम्याची किंमत ही इतर पॉलिसीच्या तुलनेत अगदीच कमी असते. विम्याची किंमत कमी असूनही, मोटार विमा अनेक परिस्थितींमध्ये जीवनरक्षक म्हणून काम करतो.
एका पॉलिसीचे अनेक आहेत फायदे –
मोटार विम्यासंदर्भातील एक सर्वात मोठा गैरसमज हा आहे की असा विमा फक्त वाहनांसाठीच आर्थिक कव्हरेज देतो. परंतु मोटार विमा पॉलिसी केवळ विमा उतरवलेल्या वाहनासाठीच नाही तर तृतीय-पक्षाच्या मालमत्तेसाठी आणि तृतीय-पक्ष व्यक्तींनाही कव्हरेज प्रदान करतात. ह्याबाबतीत मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे.
व्हेईकल इन्शुरन्समागील मूळ कल्पना ही आहे की अपघातात एखाद्या व्हॅनचे आणि तृतीय पक्षांचे झालेले नुकसान भरून काढणे. बाजारात उपलब्ध असलेल्या इन्शुरन्स कंपन्यांचे विविध प्रकारचे कव्हरेज, पॉलिसीवरील रायडर्स समजून घेऊन आणि तुमच्यासाठी सर्वात योग्य असलेली सर्वोत्तम मोटर विमा पॉलिसी निवडा.
गाडी सेफ तर आपण सेफ.