Property Under Construction and Tax Exemption : प्रत्येकाच्या मनात एक स्वप्नातलं घर नक्कीच असत. तसेच या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची सगळ्यांची इच्छा असते.
एवढंच नाही तर स्वप्नातले घर पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण दिवस रात्र झटत असतो. पण रियल इस्टेटच्या वाढलेल्या किमतीमुळे अनेकदा लगाम मागे खेचला जातो.
मात्र पूर्वीसारखे गृहकर्ज (Home Loan) घेणे अवघड राहिले नाही. गृहकर्ज प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत झालेली आहे.
गृहकर्ज पण परवडणाऱ्या म्हणजे पूर्वीपेक्षा नक्कीच कमी दराने मिळते. तसेच त्यावर अतिरिक्त लाभ घेता येतात.
आजकाल गृहकर्जावर अनेक फायदे घेता येतात. त्याचमुळे ते प्रॉपर्टी खरेदीसाठी होम लोन (Home Loan) हे एक पॉप्युलर असलेला मार्ग आहे.
Property Under Construction and Tax Exemption : प्रॉपर्टी अंडर कन्स्ट्रक्शन आणि टॅक्स सवलत.
बांधकाम सुरु असलेल्या म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या प्रॉपर्टी मध्ये केलेली गुंतवणूक सुद्धा आयकर सवलत (Tax Exemption) मिळवून देते.
अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीच्यासाठी गृहकर्ज घेऊन टॅक्स बेनिफिट घेता येतो.
तसेच अजून एक फायदा म्हणजे बांधकाम सुरु असल्याने काही रक्कम रोख स्वरूपात तुम्ही बाळगू शकता.
समजा तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन असलेली प्रॉपर्टी खरेदी केली आहे आणि त्यासाठी ईएमआय (EMI) भरणे सुरु केले असल्यास आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत मूळ रकमेवर (रु. 1.5 लाखांपर्यंत) कर कपातीचा लाभ मिळू शकतो.
तसेच अजून काही प्राप्तिकर कायदे (Income Tax Laws) आहेत त्यामार्फत डर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीच्यासाठी गृहकर्ज घेऊन टॅक्स बेनिफिट घेता येतो.
त्यासाठी तरतुदी नियम आणि यंत्रणा ह्या वेगवेगळ्या आहेत.