Thursday , 23 May 2024
Home FinGnyan How to get Credit Card : क्रेडिट कार्ड म्हणजे नेमकं काय आहे?
FinGnyan

How to get Credit Card : क्रेडिट कार्ड म्हणजे नेमकं काय आहे?

How to get Credit Card
How to get Credit Card : Finntalk

How to get Credit Card? : जवळ पैसे नसताना म्हणजे अकाउंटला बॅलेन्स नसताना गरज भागवण्यासाठी सहजी पैसे उपलब्ध करून देणारं कार्ड म्हणजे क्रेडिट कार्ड (Credit Card).

ज्या कार्डचा वापर करून पैसे नसतानाही खरेदी करू शकता, बिल भरू शकता, एखादी बुकिंग करू शकता आणि विहित मुदतीत पैसे परतफेड करू शकता.

जर विहित मुदतीच्या नंतर पैसे अदा केल्यास त्यावर व्याज भरावे लागते.

कोणी विचार केला होता की आपण घरबसल्या रात्री अपरात्री कधीही पैसे दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या शहरात राहणाऱ्या कोणालाही ट्रान्स्फर करू शकू.

हेही वाचा : Amazon Prime Day Sale : आजपासून ॲमेझॉन Prime Day सेल सुरु – मोबाईल्स पासून घरगुती वस्तूंवर मिळणार मोठा डिस्काउंट

पण आता हे सर्वकाही शक्य झालं आहे. बँकिंग क्षेत्रात झालेली तंत्रज्ञानाची क्रांती ही सर्वांसाठीच फायद्याची ठरली आहे.

बँकांनी सुद्धा या संधीच सोन करून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक स्कीम्स लॉन्च केल्या. त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे क्रेडिट कार्ड (Credit Card).

आजकाल क्रेडिट कार्डचा सर्रास वापर होतो. आता हेच पाहा ना, आपण कुठं फिरायला गेलो किंवा शॉपिंग करायला गेलो तर कधी कधी पैसे कमी पडले तर आपणही क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर करतो.

थोडक्यात सांगायचं झालं तर आपली गरज भागविण्यासाठी बँक आपल्याला क्रेडिट कार्डमार्फत पैसे उधार देत,

How to get Credit Card? क्रेडिट कार्ड कसं मिळत?

आधी क्रेडिट कार्ड सहजा सहजी मिळत नव्हतं. त्यासाठी बरीच मोठी प्रक्रिया होती. आता तस काही राहील नाहीये.

कमी लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड आता कोणालाही मिळून जात.

असं असलं तरीही क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी काही पात्रता निकष आहेत काही प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी लागते. जाणून घेऊयात याबद्दल…

क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे –

  • तुमचं वय 18 वर्षे पूर्ण असावं.
  • तुमच्याकडे निश्चित स्वरूपाचं उत्पन्न असलं पाहिजे.
  • तुमचा क्रेडिट क्रेडिट स्कोअर चांगला पाहिजे.
  • क्रेडिट कार्ड देणारी संस्था ठरवतील तशा केवायसी कागतपत्रांची पूर्तता करावी. (आधार कार्ड, पॅनकार्ड, पेमेंट स्लीप इ.)

वरील सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर क्रेडिट कार्ड देणारी संस्था सर्व कागतपत्रांची पडताळणी करते. त्यानंतर ठरवते तुम्हाला क्रेडिट कार्ड द्यायचं की नाही. क्रेडिट कार्ड सिबिल स्कोर (Cibil Score) वाढविण्याचा एक उत्तम मार्ग आहे. क्रेडिट कार्डद्वारे खर्च केलेले पैसे तुम्ही वेळेवर भरले तर तुमचा क्रेडिट स्कोर (Credit Score) चांगला होण्यास मदत होते.

Related Articles

A Rise of Bata Footwear : बाटा फुटवेअरचा उल्लेखनीय उदय.

A Rise of Bata Footwear : एका शतकापूर्वीच्या सुरुवातीपासून ते आजच्या जागतिक...

Wipro Industries Soaring to New Heights : विप्रो इंडस्ट्रीजची यशोगाथा

Wipro Industries Soaring to New Heights : जागतिक तंत्रज्ञान आणि वाढत्या गतिमान...

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची एक यशोगाथा

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची सुरुवात कशी झाली?...