Friday , 26 July 2024
Home FinGnyan What is IMPS : IMPS म्हणजे समजावून घेऊयात?
FinGnyan

What is IMPS : IMPS म्हणजे समजावून घेऊयात?

What is IMPS
What is IMPS : Finntalk

What is IMPS : हे काय…आता पाठवतो पैसे…शून्य मिनिटात करतो पैसे ट्रान्सफर… आता तरी UPI आलं आहे. पण पूर्वी सर्रास नेटबँकिंगचा वापर करून quick money ट्रान्सफर करण्यासाठी आयएमपीएस वापरले जायचे.

आयएमपीएस – Immediate Payment Service म्हणजे मोबाईल फोनच्या वापरातून तसेच इंटरनेट बँकिंगचा वापर करून पैसे दुसऱ्याच्या खात्यात तात्काळ जमा करण्यासाठी आयएमपीएसचा वापर केला जातो.

What is IMPS ? : IMPS म्हणजे…

पैसे ट्रान्सफर करण्याच्या इतर पद्धतींप्रमाणेच, आयएमपीएस ही एक पद्धत आहे जी एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर करू देते. “आयएमपीएस म्हणजे तात्काळ पेमेंट करण्यासाठीची सेवा.” 2010 मध्ये NPCI (नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) आणि RBI (भारतीय रिझर्व्ह बँक) यांनी ही पेमेंट यंत्रणा अस्तित्वात आणली.

हेही वाचा : Post Office job 2023 : भारतीय डाक विभागात 30 हजारांपेक्षा अधिक जागांवरती बंपर भरती सुरु.

दिवसाचे 24 तास ही यंत्रणा कार्यान्वित असते. शासकीय सुट्ट्या आणि इतर सुट्ट्यांच्या दिवशी पण हे यंत्रणा कार्यान्वित असते.

बँकेच्या App मधून किंवा नेटबँकिंगने पैसे ट्रान्सफर करत असल्याने सुरक्षित आणि विश्वासार्ह अशी पद्धत आहे.

मर्यादा आणि सेवा शुल्क –

जास्तीत जास्त अमाऊंट ट्रान्सफर करण्यासाठीची मर्यादा एक लाख इतकी आहे. मात्र ह्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बँक काही चार्जेस लावते.

हे चार्जेस रुपये 5 पासून रुपये 15 पर्यंत असू शकतात. बँकेच्या विविध नियमानुसार हे पैसे आकारले जातात.

काही विशिष्ठ वेळी बँका सदरील ट्रान्सफरवर सर्व्हिस चार्ज आकारू शकतात. मात्र UPI अस्तित्वात आल्यापासून IMPS वापरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

Related Articles

A Rise of Bata Footwear : बाटा फुटवेअरचा उल्लेखनीय उदय.

A Rise of Bata Footwear : एका शतकापूर्वीच्या सुरुवातीपासून ते आजच्या जागतिक...

Wipro Industries Soaring to New Heights : विप्रो इंडस्ट्रीजची यशोगाथा

Wipro Industries Soaring to New Heights : जागतिक तंत्रज्ञान आणि वाढत्या गतिमान...

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची एक यशोगाथा

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची सुरुवात कशी झाली?...