House Rent Deposit : अबबब… बंगळूर मध्ये घर भाडे अव्वाच्या सव्वा वाढली आहेत. बेंगळुरूच्या एका पॉश भागात, इंदिरानगरात सध्या भाड्याचे दर (House Rent) आणि सिक्युरिटी डिपॉझिटची (Security Deposit) रक्कम ही गगनाला भिडली आहे.
इंदिरा नगर हा भाग बंगळुरू मधला सर्वात जास्त मागणी असलेला भाग आहे. लोकॅलिटी आणि एकूणच सोयीसुविधा चांगल्या असल्याने इथं राहायला असणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. इंदिरा नगरात उपलब्ध असणाऱ्या प्रोपोर्टी आणि त्या भागाची असलेली डिमांड ह्याचे गुणोत्तर सध्या व्यस्त आहे. गरजेनुसार प्रॉपर्टी अव्हेलेबल नाही तर ज्या आहेत त्यांना असलेली मागणी ज्यादा आहे.
घरांची भाडेवाढ साधारण 30-40% ने झालेली असल्याने आता नव्याने येणाऱ्या लोकांना भाडे आणि डिपॉझिट ह्याची पूर्तता करताना दमछाक होते आहे. सद्यस्थितीत ह्या इंदिरानगरच्या भागात डिपॉझिटची रक्कम घरभाड्याच्या दहापट तरी आहे. जी साधारण सरासरी 4 लाख ते 8 लाखाच्या घरात जाते.
घरभाडेही गगनाला भिडले…
1 BHK सेमी फर्निश्ड फ्लॅटचे भाडे कमीत कमी 30-35 हजारांच्या आसपास आहे. तर 2 BHK सेमी फर्निश्ड फ्लॅटचे भाडे हे जवळपास 45-50 हजार रुपये इतके जाते. 3 BHK फ्लॅट्स तुलनेने कमी उपलब्ध आहेत पण त्यांचे भाडे हे एखाद लाख रुपयांच्या आसपास जाते.
गेल्या दिवाळीपासून इथल्या घरभाड्याची रक्कम वाढतच जात आहे. गुरगाव मधून बंगळुरूला शिफ्ट झालेल्या एका व्यक्तीने घर भाड्याने घेण्यासाठी सेक्युरिटी डिपॉझिट द्यायला किडनी विकावी लागेल असे ट्विट करून आपली कैफियत मांडली. ह्यातला गमतीचा भाग सोडल्यास रियल इस्टेटमधल्या किमती आता गगनाला भिडल्या असल्याचे एकूणच चित्र आहे.