Transfer Pricing : मागच्या आठवड्यात बीबीसीच्या (British Broadcasting Corporation) दिल्ली आणि मुंबई या दोन्ही कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले. यानंतर भारतच काय संपूर्ण जगभरात याचे पडसाद उमटले. मोदी सरकार गंडलंय का? मोदी सरकार सत्ता आहे म्हणून काहीही करायला लागलंय? असा टीकेचा सूर देशातील सर्वच विरोधी पक्षांनी काढला. एवढाच नाही तर ग्रेट ब्रिटनच्या संसदेत सुद्धा याचे पडसाद उमटले होते.
‘बीबीसी’वर छापे की आर्थिक सर्वेक्षण???
ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (BBC) मुंबई तसेच दिल्ली येथील कार्यालयांवर करचुकवेगिरी केल्याच्या आरोपाखाली आयकर विभागाने कारवाई केली. हे छापे नसून आर्थिक सर्व्हेक्षण असल्याचे सांगण्यात येत होत.
प्रकरण का चिघळलं?
काही दिवसांपूर्वी बीबीसीने गुजरात दंगलीवर एक सिरीज बनवली होती ज्याचं डायरेक्ट कनेक्शन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाशी निगडित होत. यानंतर ट्रान्सफर प्राइसिंगच्या (Transfer Pricing) संशयावरून बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई या कार्यालयावर छापे पडले. आयकर विभागाच्या सूत्रांच्या मते बीबीसीने (BBC) जाणूनबुजून ट्रान्सफर प्राइसिंग (Transfer Pricing) नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे बीबीसीच्या कार्यालयाचे सर्वेक्षण करण्यात आले. पण या प्रकारानंतर जो सरकारविरोधी असेल त्यावर आयकर विभागाची धाड पडायची हा फक्त समाज न राहता त्यावर लोकांचा पूर्ण विश्वास बसला. पण ट्रान्सफर प्राइसिंग म्हणजे काय? ज्यामुळे बीबीसीवर आयकर विभागाकडून कारवाई करण्यात आली. जाणून घेऊयात याबद्दल…
ट्रान्सफर प्राइसिंग म्हणजे काय?
ट्रान्सफर प्राइसिंग (Transfer Pricing) निश्चित करणे ही एक अकाउंटिंग मेथड (accounting method) आहे. हे कंपनीमधील एका विभागाला त्याच कंपनीच्या दुसर्या विभागाकडून मिळालेले किंवा देय असलेले मूल्य दर्शवते.
म्हणजेच कोणत्याही एका कंपनीचे काही विभाग त्याच कंपनीतील इतर विभागांकडून वस्तू किंवा सेवा खरेदी किंवा विक्री करत असतात. असा व्यवहार करत असताना रोख रकमेचा वापर न करता फक्त तेवढी रक्कम खात्यात ट्रान्स्फर केली जाते यालाच आयकराच्या भाषेत ट्रान्सफर प्राइसिंग म्हणतात.
बीबीसी प्रकरणात काय झाले?
बीबीसीच्या (BBC) प्रकरणात देखील हेच झाले. बीबीसीने ट्रान्सफर प्राइसिंगच्या नियमांचे पालन वर्षानुवर्षे सातत्याने होत नसल्याचे आयकर विभागाने सांगितले आहे. यासंदर्भात बीबीसीला अनेक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, बीबीसीने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आयकर विभागाने बीबीसीच्या कार्यालयावर आर्थिक सर्वेक्षण केलं