Friday , 1 November 2024
Home FinNews Bank Holidays : बँकेतील महत्वाची कामे करण्यापूर्वी बँकांच्या सुट्ट्यांची यादी आधी तपासा.
FinNews

Bank Holidays : बँकेतील महत्वाची कामे करण्यापूर्वी बँकांच्या सुट्ट्यांची यादी आधी तपासा.

Bank Holidays : एक काळ असा होता की बँकांचे कोणतेही व्यवहार करायचे असल्यास आपल्याला ते परस्पर बँकेत जाऊनच करावे लागत होते. पैसे काढणे किंवा डिपॉजिट करणे, पैसे इतर कोणाला ट्रान्स्फर करणे किंवा आपला अकाउंट बॅलन्स तपासणे यांसारखे शुल्लक कामे करण्यासाठी देखील आपल्याला बँकेत जावं लागत होत. त्यात घरातील वयोवृद्ध आजी आजोबांचं बँकेत काम असेल तर खूप कसरत करावी लागत असे. पण आता तस काही राहील नाहीये. बँकांची जवळपास सर्व कामे आता ऑनलाईन झाली आहेत. बँकेत अकाउंट ओपन करायचं म्हटलं तरी आता बँकेत जायची गरज उरलेली नाही. बँकेत अकाऊंट उघडणं, पैसे पाठवणं, पैसे घेणं, मोबाईल रिचार्ज करणे किंवा इतर काही बिलं भरणे यांसारखे बरीच काम आपण घरबसल्या मोबाईल वरून करू शकतो. तेही दिवसाचे 24 तास वर्षाची 365 दिवस. अशा भारी सर्व्हिसेस बँका आता त्यांच्या ग्राहकांना देत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची होणारी धावपळ कमी होण्यास मदत झाली आहे.

परंतु अजूनही बँकांची काही कामे करण्यासाठी आपल्याला बॅंकेतचं जावं लागत. त्यासाठी आपल्याला वेळ हा काढावाच लागतो. कधी कधी असं होत की, दिवसभराच्या थकवणाऱ्या शेड्युलमधून आपण बँकेत जाण्यासाठी टाईम काढतो आणि तिथे गेल्यावर बँक बंद असते. अशा वेळी होणारी चिडचिड बहुतांश लोकांनी अनुभवलेली असेल. कधी कधी तर या चिडचिडीचा राग आपल्या घरच्यांवर देखील निघतो. असा अनुभव टाळण्यासाठी बँका कोणकोणत्या दिवशी बंद असणार आहे याची माहिती असणे आवश्यक आहे. याबाबतची माहिती घेऊनच बँकेच्या कामाचं नियोजन करा.

येणाऱ्या मार्च महिन्यात बँका कोणकोणत्या दिवशी बंद असणार?

चालू असलेला फेब्रुवारी 2023 महिना जवळपास संपलाच आहे. येऊ घातलेल्या मार्च महिन्यात बँका किती दिवस आणि कोणत्या वारी बंद असणार आहे याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) माहिती दिली आहे. आरबीआयच्या कॅलेंडरनुसार मार्च महिन्यात भारतातील बँकांना तब्बल 12 दिवस सुट्ट्या असणार आहे. त्यामुळे राज्य आणि तिथल्या विविध सणांनुसार या सुट्ट्या बदलू शकतात.

मार्च महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी :

  • 3 मार्च, 2023 : चापचर कुट (मोझोराम मधील बँकांना सुट्टी)
  • 5 मार्च, 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
  • 7 मार्च, 2023 : धूलिवंदन , होळी (दुसरा दिवस) , होलिका दहन , धुलंडी , डोल जत्रा
  • 8 मार्च, 2023 : धुलेती , डोलजात्रा , धुलिवंदन , याओसांग दुसरा दिवस
  • 9 मार्च, 2023 : होळी (पटना)
  • 11 मार्च, 2023 : महिन्याचा दुसरा शनिवार
  • 12 मार्च, 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
  • 19 मार्च, 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
  • 22 मार्च, 2023 : गुढीपाडवा
  • 25 मार्च, 2023 : महिन्याचा चौथा शनिवार
  • 26 मार्च, 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
  • 30 मार्च, 2023 : श्रीराम नवमी

वरील सर्व सुट्ट्या आरबीआय निर्देशित आहेत. सुट्ट्यांमध्येही बँकेच्या ऑनलाईन सुविधांचा लाभ घेऊ शकता. तसेच तुम्हाला बँकेत काही काम असल्यास तुम्ही वरील माहितीचा आधार घेऊन योग्य ते नियोजन करू शकता.

Related Articles

Banknotes with star symbol : ‘स्टार’ चिन्ह असलेल्या नोटा कायदेशीर आहेत का?

Banknotes with star symbol : ‘स्टार’ चिन्ह असलेल्या नोटा काय आहेत? ते...

Highest Tax paying Indian Celebrities : उच्च Tax भरणारे भारतीय सेलिब्रिटी

Highest Tax paying Indian Celebrities : अनेक सेलिब्रिटी दरवर्षी करोडो रुपये कमावतात...

Government Reduces GST Rate : मोबाईलसह अनेक गृहोपयोगी वस्तूंच्या जीएसटीमध्ये कपात.

Government Reduces GST Rate : मोबाईल, टीव्हीसह अनेक गृहोपयोगी वस्तूंच्या जीएसटीमध्ये मोठी...