Why wealth creation is challenging शिक्षण पूर्ण झाल्यावर चांगली नोकरी किंवा व्यवसाय सुरु व्हावा. त्यामधून पुरेशी कमाई व्हावी. कमाईतून बचत व्हावी. ही बचत वाढत जाऊन संपत्ती तयार व्हावी.
संपत्तीची सातत्याने वाढ होत राहावी असे प्रत्येकाला वाटत असते. धनवान, श्रीमंत व्हावे असे प्रत्येकाला वाटणे साहजिक असते.
संपत्ती असणारी माणसे पाहिली की आपणही त्यांच्यासारखे व्हावे असे वाटणे साहजिक आहे. वाटणे आणि तसे प्रत्यक्षात होणे ह्यात बराच फरक आहे.
कारण प्रत्यक्षात हे स्वप्न खरे व्हायला सातत्याने नियोजन (Financial Planning) आणि त्याची अमलबजावणी आवश्यक आहे.
सर्वात आधी मालमत्ता (Asset) आणि दायित्व (Liability) ह्यातला फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे.
मालमत्ता निव्वळ उत्पन्न निर्माण करतात आणि दायित्वे म्हणजे खर्च. एसेट्स हे उत्पन्न देतात तर लायेबिलिटीवर निव्वळ खर्च होतो.
Why wealth creation is challenging : Assets प्रकारात खालील गोष्टी येतात –
- सेव्हिंग अकाउंटमधली बाजूला काढलेली रोख रक्कम
- पेन्शन प्लॅन मधली गुंतवणूक
- युलिप आणि तत्सम पॉलिसीमध्ये केलेली गुंतवणूक
- आयुर्विमा आणि टर्म इन्शुरन्स
- कर्ज नसलेली भाडे मिळवून देणारी प्रॉपर्टी
- ह्या प्रकारातल्या गुंतवणूक जेंव्हा वाढत जातील तेंव्हा संपत्ती निर्माण होत राहते.
ज्या गुंतवणुकीतून रिटर्न्स चांगले आणि सातत्याने येतील ती गुंतवणूक wealth म्हणजे संपत्ती निर्माण करते. संपत्ती निर्माण करताना सुरुवातीला Liability कमी कश्या करता येतील ह्यावर लक्ष देणे जरुरी आहे.
तसेच केलेल्या गुंतवणूकीशिवाय नवीन गुंतवणूक कुठे कधी आणि कशी करता येईल ह्याकडे नियोजनबद्ध रीतीने विचार करत राहावा लागेल.
अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर, एका इन्कम सोर्स वर अवलंबून न राहता एकापेक्षा जास्त इन्कम सोर्स सातत्याने कार्यरत राहतील ह्याकडे सातत्याने लक्ष ठेवावे लागेल.