What Is Vostro Account? : भारताचा रुपया भविष्यात डॉलरला मागे टाकू शकतो, अनेक देशांनी व्यापार करण्यासाठी चलन म्हणून भारतीय रुपयाला मान्यता दिली आहे. आशा बातम्या नुकत्याच तुम्ही ऐकल्या असतील. तसेच व्यापारांतर्गत होणारी पैश्यांची देवाण-घेवाण ही व्होस्ट्रो अकाउंट मार्फत होणार आहे अशी देखील माहिती तुम्ही ऐकली असेल किंवा काही देशांनी भारतीय रिझर्व्ह बँकेत व्होस्ट्रो अकाउंट (Vostro Account) उघडले आहेत ही माहिती देखील तुम्ही ऐकली असेल, पण हे वोस्ट्रो अकाउंट म्हणजे नेमकं काय?
वोस्ट्रो अकाउंट आंतराष्ट्रीय पातळीवर कसं काम करत असेल? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. याच प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.
What Is Vostro Account? : व्होस्ट्रो खाते म्हणजे काय?
व्होस्ट्रो अकाउंट हे असे खाते आहे जे एखाद्या संवादक बँकेने दुसऱ्या बँकेच्या वतीने ठेवलेले असते. ज्यामध्ये निधी धारण करणारी बँक परदेशी समकक्षाच्या खात्यासाठी संरक्षक म्हणून काम करते किंवा पैसे व्यवस्थापनाचं काम करते. उदाहरणार्थ, एखाद्या विदेशी कंपनीने निधी व्यवस्थापित करण्यासाठी भारतीय बँकेशी संपर्क साधल्यास, हे खाते होल्डिंग बँकेद्वारे या विदेशी कंपनीचे व्होस्ट्रो खाते म्हणून मानले जाते.
हेही वाचा : सशस्त्र सीमा बलात 1 हजार 646 जागांवर भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या
देशांतर्गत बँका याचा वापर त्यांच्या ग्राहकांना म्हणजेच ज्या व्यावसायिकांचा व्यापार आंतराष्ट्रीय पातळीवर चालतो अशा ग्राहकांना आंतरराष्ट्रीय बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी करतात.
जेणे करून त्या व्यावसायिकांना संबंधित देशातील चलनात कोणत्याही अडचणींशिवाय आर्थिक व्यवहार करता येतात.