Wednesday , 29 May 2024
Home FinNews ED has filed chargesheet on Razerpay : चायनीज लोन ॲप प्रकरणी रेझरपेवर ईडीने केली चार्जशीट दाखल.
FinNews

ED has filed chargesheet on Razerpay : चायनीज लोन ॲप प्रकरणी रेझरपेवर ईडीने केली चार्जशीट दाखल.

ED has filed chargesheet on Razerpay : ईडीची पीडा आता प्रत्येक राज्यात चांगलीच सक्रिय झाली आहे. आता परदेशी गुंतवणूक असणाऱ्या मुख्यत्वे चिनी गुंतवणूक असणाऱ्या भारतीय स्टार्टअप कंपन्यांमधील होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर ED ची बारीक नजर आहे. तसेच आर्थिक गैरव्यवहार आढळून येत आहेत म्हणून ED बेधडक छापेही मारत आहे. याबाबतच्या आपण रोज बातम्याही पाहतो. आता फिनटेक कंपनी ‘रेझरपे’ ED च्या जाळ्यात अडकली आहे. अनेक नागरिकांची फसवणुक केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर ED ने ‘रेझरपे’वर चार्जशीट दाखल केलं आहे. (ED has filed chargesheet on Razerpay)

चिनी नागरिकांचे नियंत्रण असलेल्या फिनटेक क्षेत्रातील मॅड एलिफंट नेटवर्क टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, बॅरिओनिक्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड आणि क्लाउड अॅटलस फ्यूचर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांवर ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. यासोबत आणखी पाच व्यक्तींविरुद्ध फिर्यादी तक्रार ईडी कडून दाखल करण्यातआहे.

न्यायालयाकडून तक्रारीची नोंद :

संबंधित कंपन्यांच्या अँपमधून कर्ज घेतलेल्या ग्राहकांचा रिकव्हरी एजंटकडून छळ होत असल्याची तक्रार आल्यानंतर ED ने आरोपपत्र दाखल केले होते. आता या आरोपपत्राची मनी लॉंडरिंग प्रतिबंधक कायद्याशी संबंधित (पीएमएलए) बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने दाखल घेतली आज. या आरोपपत्रामध्ये 7 संस्थांचा आणि 5 नागरिकांचा समावेश आहे. यासोबत पेमेंट गेटवे Razorpay Software Pvt Ltd या कंपनीचे देखील आरोपपत्रात आरोपी म्हणून नाव आहे.

ED च्या तपासात असं समोर आलं आहे की, कर्ज वितरणासाठी संबंधित फिनटेक कंपन्या, संस्था आणि डिजिटल कर्ज देणारे अँप यांच्यामध्ये करार झालेले आहेत. एवढंच नाही तर या कंपन्या हा धंदा सावकारी पद्धतीने बेकायदेशीरपणे चालवतात. तसेच कारवाईची भीती न बाळगता ‘रेझरपे’ सारख्या कंपन्या व डिजिटल कर्ज देणारे अँप कमिशनसाठी जाणूनबुजून त्यांची नावे वापरू देतात.

आता ईडीच्या या कारवाईनंतर नियमांची पायमल्ली व फसवणूक करून कर्ज वाटणाऱ्या इतर फिनटेक कंपन्या व डिजिटल कर्ज देणारे अँप यांना चांगलीच चाप बसणार आहे.

Related Articles

Banknotes with star symbol : ‘स्टार’ चिन्ह असलेल्या नोटा कायदेशीर आहेत का?

Banknotes with star symbol : ‘स्टार’ चिन्ह असलेल्या नोटा काय आहेत? ते...

Highest Tax paying Indian Celebrities : उच्च Tax भरणारे भारतीय सेलिब्रिटी

Highest Tax paying Indian Celebrities : अनेक सेलिब्रिटी दरवर्षी करोडो रुपये कमावतात...

Government Reduces GST Rate : मोबाईलसह अनेक गृहोपयोगी वस्तूंच्या जीएसटीमध्ये कपात.

Government Reduces GST Rate : मोबाईल, टीव्हीसह अनेक गृहोपयोगी वस्तूंच्या जीएसटीमध्ये मोठी...