What Is Nostro Account? : दोन देशांमध्ये व्यापार करायचा म्हटलं तर आर्थिक व्यवहारांसाठी पूर्वी डॉलर या चलनाचा वापर आर्थिक व्हायचा. सध्याही दोन देशांमधील व्यापारासाठी डॉलर याच चलनाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. पण व्यापाराला आणखी बळकटी देण्यासाठी स्थानिक चलनात देखील आर्थिक व्यवहार होणं गरजेचं होत, त्यासाठी व्होस्ट्रो अकाउंटची (Vostro Account) संकल्पना अस्तित्वात आली. व्होस्ट्रो अकाउंट (Vostro Account) परकीय चलन आणि व्यावसायिक आर्थिक व्यवहार सुलभ करण्यासाठी वापरला जातो. याबद्दलची माहिती आपण मागील लेखात पहिलीचं आहे, आता व्होस्ट्रो अकाउंटचा आणखी एक प्रकार ‘नॉस्ट्रो अकाउंट’ याबद्दलची (What Is Nostro Account?) माहिती पाहणार आहोत.
नॉस्ट्रो अकाउंट म्हणजे काय?
नोस्ट्रो खाते म्हणजे (What Is Nostro Account?) एखाद्या बँकेने दुसऱ्या देशाच्या बँकेत परकीय चलनात ठेवलेले खाते. नॉस्ट्रो (Nostro) हा शबद नॉस्ट्रोस (Nostros) या लॅटिन शब्दापासून तयार झालेला शब्द आहे. नॉस्ट्रोस (Nostros) म्हणजे “आमच्या” असा या शब्दाचा आपल्या भाषेत अर्थ होतो. तसेच नॉस्ट्रोचा विरुद्धार्थी शब्द “व्होस्ट्रो” हा देखील लॅटिन भाषेतील शब्द आहे. “व्होस्ट्रो” म्हणजे “तुमचे”.
हे ही वाचा : जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन.
नोस्ट्रो अकाऊंट कसं काम करत?
नॉस्ट्रो अकाऊंट आणि व्होस्ट्रो अकाऊंट हे प्रत्यक्षात एकचं आहेत परंतु दोन्ही खात्यांचा दृष्टीकोन वेगळा आहे. उदाहरणार्थ, भारतातील बँक X चे खाते जर्मनीच्या बँक Y मध्ये त्यांच्यात जर्मन चलनात आहे. म्हणजेच भारतातील बँक X साठी ते एक नॉस्ट्रो अकाउंट आहे, तर तर जर्मनीतील बँक Y साठी, ते व्होस्ट्रो अकाउंट आहे,
या खात्यांचा वापर आंतरराष्ट्रीय व्यवहार सुलभ करण्यासाठी आणि विनिमय दराच्या जोखमीला बचाव करणारे व्यवहार सेटल करण्यासाठी केला जातो. वैयक्तिक किंवा व्यावसायिक खात्यांपेक्षा ही खाती वेगळी असतात. भारतीय बँकिंग आणि जागतिक बँकिंग मधली ताहिती आपल्याला सगळी नसते. आपल्या कामापुरती माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. आम्ही आपणाला अशी ज्ञानवर्धक माहिती नियित देत राहू. आपण आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंटला पण जरून फॉलो करा.