What is Finntalk : आजच्या फास्ट युगात आपण स्वतः आर्थिक आघाडीवर कसे अद्ययावत राहू शकतो? आर्थिक शिक्षणाचे महत्त्व आतातरी आपल्याला समजलेच पाहिजे.
FinnTalk… आजच्या वेगवान जगात आपल्यासाठी आणि आपल्या व्यवसायांसाठी फिनान्शिअल नॉलेज बद्दल अपडेट राहणे महत्त्वाचे आहे.
आर्थिक शिक्षण आपल्याला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करते. आपले आर्थिक भवितव्य सुरक्षित करण्यास अर्थज्ञान फायदेशीर असते.
आजच्या ह्या फास्ट लाईफ मध्ये सतत बदलणारे आर्थिक ट्रेंड्स आणि अशा वातावरणात भरभराट होण्यासाठी नवीनतम घडामोडींसह आपण अद्ययावत राहणे आवश्यक आहे.
FinnTalk पोर्टलवरील माहिती आपल्याला या बदलांशी प्रभावीपणे जुळवून घेण्यासाठी सुसज्ज करते.
पर्सनल फायनान्स, गुंतवणुकीच्या संधी, विविध व्यवसायिक घडामोडी, नवनवीन आर्थिक सवलती, बिझनेस करण्यासाठीच्या बेसिक गोष्टी, फायनान्शिअल प्लॅनिंग, नवीन बजेट आणि आपले नियोजन, इकॉनॉमिक्स मधल्या विविध बाबी ह्या विषयांवर आपणाला नियमित माहिती मिळू शकेल असे हे FinnTalk पोर्टल आहे.
FinnTalk वरील आर्थिक माहिती ही पूर्णपणे मोफत आणि सातत्याने अपडेटेड असणारी आहे. तंत्रज्ञानाच्या ह्या बदलत्या युगात हे एक शक्तिशाली साधन बनले आहे.
साध्यासोप्या मराठी भाषेत ही माहिती आम्ही आपणापर्यंत पोहोचवतो. पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट (Personal Finance Management) करायला मदत करणारे फिनटॉक हे पोर्टल सतत माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी आणि दीर्घकालीन यश मिळविण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्यांनी समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
What is Finntalk : ह्या पोर्टलचा फायदा नेमका कुणाला होऊ शकतो?
कॉलेजमध्ये कॉमर्स ह्या विषयाचे शिक्षण घेणारी विद्यार्थी, नुकतेच नोकरीला लागलेली तरुण मंडळी, शाळा कॉलेजात अर्थशास्त्र आणि इतर आर्थिक विषय शिकवणारी शिक्षक मंडळी, MBA करत असणारी विद्यार्थी मंडळी, आर्थिक क्षेत्रात काम करणारी माणसे ह्या सगळ्यांना ह्या पोर्टलचा फायदा होऊ शकेल.
काय असतं ह्या पोर्टलवर ?
नवनवीन आर्थिक संकल्पना, ताज्या आर्थिक बातम्या, फायनान्स मधल्या गुंतवणुकीच्या विविध स्कीम्स, शासन धोरणे, शासकीय गुंतवणुकीच्या स्कीम्स आणि इतर विविध उपयुक्त अद्ययावत अशी माहिती ह्या पोर्टलवर सातत्याने अपडेट होत असते.