Tuesday , 9 April 2024
Home FinGnyan What Is Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?
FinGnyanInvestment

What Is Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?

Frankfurt, Hesse, Germany - April 17, 2018: Many coins of various cryptocurrencies

What Is Cryptocurrency : कोरोना काळापासून म्हणा किंवा गेल्या काही दिवसांपासून क्रिप्टोकरन्सीचा ट्रेंड जगभरात पसरला आहे.

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करून अनेक अभ्यासू गुंतवणूकदारांनी चांगलचं नफा कमवला आहे.

आता तर अनेक नामांकित कंपन्यांनी त्यांच्या वस्तू आणि सेवांसाठी पेमेंट म्हणून क्रिप्टोकरन्सी स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.

तसेच सध्या मार्केट डाऊन असलं तरीही अनेक गुंतवणूकदार क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत आहेत. पण अजूनही अनेकांसाठी क्रिप्टोकरन्सी म्हणजे एक प्रश्नचिन्हच आहेच.

तर क्रिप्टोकरन्सी म्हणजे नेमकं काय? याचा चलन म्हणून पण वापर करतात आणि गुंतवणूक म्हणून देखील? असं कसं बाबा? तेच जाणून घेऊयात…

What Is Cryptocurrency : चला क्रिप्टोकरन्सीचा अर्थ समजून घेऊन सुरुवात करूया…

क्रिप्टोकरन्सी हे क्रिप्टोग्राफीद्वारे सुरक्षित केलेले असे डिजिटल टोकन किंवा आभासी चलन आहे ज्यांचे मूल्य बाजार मागणी प्रमाणे बदलत असते,

तसेच क्रिप्टोकरन्सी हे सेवांच्या बदल्यात पैसे देण्यासाठी वापरले जाते आणि ओपन-सोर्स ब्लॉकचेन लेजर तंत्रज्ञानाद्वारे व्यवस्थापित केले जाते.

ते विकेंद्रित (Decentralized) स्वरूपासाठी ओळखले जातात, ज्यामुळे ते सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त होतात. शिवाय, क्रिप्टोग्राफी तंत्रज्ञान बनावट किंवा दुप्पट खर्च करणे अशक्य करते.

प्रथम पीअर-टू-पीअर (Peer-to-peer) विकेंद्रित क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन (Bitcoin) होती, ज्याने 2009 मध्ये पदार्पण केले.

सध्या, बाजारात सुमारे 10,000 क्रिप्टोकरन्सी उपलब्ध आहेत आणि CoinMarketCap.com कंपनीने (वेबसाईट) ऑगस्ट 2021 मध्ये प्रकाशित केलेल्या डेटानुसार, त्यांचे एकूण मूल्य $1.9 ट्रिलियन डॉलर होते म्हणजे जवळपास 15,44,42,45,00,00,000 एवढ्ये भारतीय रुपये.

सध्या भारतासह अनेक देशांनी क्रिप्टोकरनसी व्यवहार आणि गुंतवणूक करण्यासाठी नियामक स्थिती अद्याप तयार केलेली नाहीत. परंतु मागील 2022-23 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोकरन्सी बाबत नियामक बनवले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती.

क्रिप्टोकरन्सीचे प्रकार किती आहेत? क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग कशी करायची? क्रिप्टोकरन्सी नेमकी कशी काम करते? अशा अनेक प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळतील पुढच्या लेखात.

Related Articles

Post Office Monthly Income Scheme : पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना – बचत करण्याचा एक खात्रीशीर पर्याय

Post Office Monthly Income Scheme : कमी जोखमीच्या पर्यायांमध्ये केलेली गुंतवणूक केव्हाही...

A Rise of Bata Footwear : बाटा फुटवेअरचा उल्लेखनीय उदय.

A Rise of Bata Footwear : एका शतकापूर्वीच्या सुरुवातीपासून ते आजच्या जागतिक...

Wipro Industries Soaring to New Heights : विप्रो इंडस्ट्रीजची यशोगाथा

Wipro Industries Soaring to New Heights : जागतिक तंत्रज्ञान आणि वाढत्या गतिमान...