What is CIBIL Score : आपल्याला कर्ज घेताना किंवा क्रेडिटकार्ड साठी अर्ज करताना सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर हे शब्द आपल्या कानावर पडले असतील.
आता कर्ज घेताना सिबिल किंवा क्रेडिट स्कोअरचा काय संबंध आहे भो…? चला तर मग CIBIL म्हणजे काय आणि कर्ज घेताना क्रेडिट स्कोअरच महत्व किती? समजून घेऊयात..
What is CIBIL Score : CIBIL नेमकं काय आहे?
CIBIL (Credit Information Bureau India Limited) ही एक क्रेडिट ब्युरो किंवा क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे.
जी कंपन्यांच्या क्रेडिट संबंधित ऍक्टिव्हिट्स तसेच क्रेडिट कार्ड आणि कर्जांसह व्यक्तींच्या नोंदी ठेवते.
यासोबत वैयक्तिक माहितीची चोरी आणि संभाव्य फसवणुकीपासून संरक्षण करण्यासाठी माहिती आणि साधने प्रदान करते.
क्रेडिट स्कोअर म्हणजे काय?
क्रेडिट स्कोअर हा ग्राहकाच्या क्रेडिट इतिहासाचा तीन अंकी अंकीय सारांश असतो. CIBIL स्कोअर 300 आणि 900 च्या दरम्यान असतो.
एखाद्या व्यक्तीचा CIBIL स्कोर 900 च्या जितका जवळ असेल, तितकी व्यक्तीचे क्रेडिट कार्ड किंवा कर्ज अर्ज मंजूर होण्याची शक्यता जास्त असते.
म्हणजेच कोणतीही बँक आणि पतसंस्था आपली आर्थिक परिस्थिती पाहण्यासाठी आपला क्रेडिट स्कोर चेक करते. हा क्रेडिट स्कोर पाहूनच बँक आपल्याला कोणतेही लोन किंवा क्रेडिट कार्ड द्यायचे का नाही हे ठरवते.