UPI Payment : मला बँकेत जायचं आहे, पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, ऑनलाईन ट्रान्सफर करताना वेळ जातोय अशी अनेक कारणे आपण आजवर ऐकली असतात. 2009 साली NCPI म्हणजे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया स्थापन झाले. रियल टाइम म्हणजे तत्क्षणी पर्सन टू पर्सन किंवा पर्सन टू मर्चंट पेमेंट्स करण्यासाठी UPI चा जन्म झाला. UPI म्हणजे यूनिफाईड पेमेंट इंटरफेस Unified Payments Interface.
UPI ही सध्याच्या काळातली लोकप्रिय मोबाइल पेमेंट (Mobile Payment) यंत्रणा आहे जी एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात रक्कम त्वरित आणि विनामूल्य हस्तांतरित करण्यासाठी वापरली जाते. UPI ने बँक खातेधारकांसाठी आर्थिक व्यवहार करणे खूप सोपं केलं आहे.प्रत्येक बँक खाते धारकाचा एक UPI आयडी असतो. त्या आयडीद्वारे दुसऱ्याच्या म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या किंवा बिझनेसच्या आयडीला म्हणजे त्याच्या बँक खात्यात पैसे पाठवता येतात.
UPI बाबत महत्वाच्या काही गोष्टी –
- UPI सर्व्हिस फास्ट म्हणजे अगदी काही सेकंदात पैसे ट्रान्सफर करते.
- भारतातल्या बहुतांश सर्वच बँका UPI सर्व्हिसचा अवलम्ब करतात.
- ह्याद्वारे केलेले पेमेंट हे सुरक्षित असून मोबाईल सिमकार्ड आणि MPIN चा वापर करूनच पेमेंट करता येते.
- UPI द्वारे केलेले पेमेंटस पूर्णतः फ्री असून 24 तास करण्याची सुविधा उपल्बध आहे.
- पेमेंट करताना प्रॉब्लेम आल्यास तक्रार ऑनलाईन लगेचच त्या प्लॅटफॉमवर करता येते.
- पैसे डायरेक्ट तात्काळ बँक खात्यात जमा होत असल्याने वापरकर्त्यांसाठी सोयीचे होते.
- काही एप्स ह्या मार्फत केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर डिस्काउंट आणि कुपन्स देतात. ज्याचा फायदा वापरणाऱ्याला होतो आणि UPI चा वापर वाढतो.
भारतात शोधली गेलेली ही UPI यंत्रणा आता जगात आपले साम्राज्य वाढवत आहे. अनेक देशांनी ही अस्सल भारतीय व्यवस्था आता स्वीकारली आहे.