Unified Payments Interface : अब पैसे चुटकीमें ट्रान्सफर करो…. खरंच एका छोट्या क्लीकवर पैसे ट्रान्सफर व्हायला लागतील असं पूर्वी कधी वाटलंही नव्हतं. UPI ने (Unified Payments Interface) भारतीय बँकिंग आणि अर्थकारणात क्रांती घडविली आहे. नुसत्या मोबाईलवरून दुसऱ्याला पैसे पाठवता येणे शक्य झाले आहे. अगदी चुन्याची पुडी घेतली तरी त्याचे पैसे UPI ने (Unified Payments Interface) देणारी माणसे आहेत.भाजी खरेदी करायची असो की गाडीत इंधन भरायचे असो, UPI आणि तत्सम पेमेंट एप्सचा वापर करून पैसे अदा करणारी आणि पैसे स्वीकारणारी व्यवस्था भारतात चांगल्या रीतीने सेट झालेली आहे. कोरोना काळात ह्याचा वापर आणि स्वीकार सर्वार्थाने झाला.
UPI मुळे इंटरनेट बँकिंगमध्ये घडली क्रांती –
UPI आल्याने इंटरनेट बँकिंग (internet Banking) मध्ये क्रांती झाली. NEFT/IMPS अश्या किचकट व्यवस्थांना बाजूला सारून UPI ने सर्वसामान्यांना डिजिटल पेमेंट व्यवस्था सोप्या पद्धतीने वापरावयास मदत केली. रियल टाइम पेमेंट प्रकारात भारताने जोरदार मुसंडी मारली. 2020 मध्ये UPI चा वापर करून झालेल्या पेमेंट्सची संख्या जवळपास 25अब्ज इतकी होती. जवळपास 40अब्ज रुपये ह्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यात आले म्हणजेच हा आकडा भारताच्या GDP च्या जवळपास 15%इतका होता. 2019 मध्ये जवळपास 3100 कोटी रुपयांचे व्यवहार झाले तर 2021 च्या शेवटी हाच एकदा 9000 कोटी रुपयांवर पोहोचला होता.
अनेक देशांनी UPI यंत्रणा स्वीकारली –
फोन पे, गुगल पे, पेटीएम आणि इतरही काही एप्स आहेत त्यामार्फत हे सर्व व्यवहार चुटकीसरशी होत आहेत. भारतीय लोकांनी तर आता ही UPI क्विक ट्रान्सफर व्यवस्था आता चांगलीच स्वीकारली असून परदेशातही UPI चा डंका वाजतोय. भारताव्यतिरिक्त आता इतरही अनेक देशांनी आपली ही UPI यंत्रणा स्वीकारली आहे. जवळपास 8-70 देशांनी ही यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे.
बदल हा स्थायीभाव असतो. आर्थिक बदल समृद्धीकडे नेणारे असतील तर ते लवकरात लवकर स्वीकारणे व्यवहार्य असते.