Saturday , 14 September 2024
Home FinNews Arshad Warsi YouTube Scam : अभिनेता अर्शद वारसीवर सेबीची कारवाई; शेअरच्या किमती फुगवल्या प्रकरणी स्टॉक मार्केटमध्ये व्यवहार करण्यास घातली बंदी.
FinNewsStartups

Arshad Warsi YouTube Scam : अभिनेता अर्शद वारसीवर सेबीची कारवाई; शेअरच्या किमती फुगवल्या प्रकरणी स्टॉक मार्केटमध्ये व्यवहार करण्यास घातली बंदी.

Arshad Warsi YouTube Scam : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी त्याची पत्नी मारिया गोरेटीसह इतर 43 जणांना सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) स्टॉक मार्केटवर कोणतेही व्यवहार करणयास बंदी घातली आहे. दोन वेगवेगळ्या YouTube चॅनेलवर 2022 मध्ये दिशाभूल करणारे व्हिडिओ अपलोड करून शेअरच्या किमती फुगवल्या प्रकरणी सेबीने अर्शद वारसीसह त्याची पत्नी आणि इतर 43 जणांवर कारवाई केली आहे. सेबीकडे शेअरच्या किमती फुगवल्या केल्याची तक्रार आली होती. सेबीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर अभिनेता अर्शद वारसी आणि त्याच्या पत्नीसह एकूण 45 जणांवर स्टॉक मार्केटमध्ये व्यवहार करण्यास सेबीने बंदी घातली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

एप्रिल-सप्टेंबर 2022 या कालावधीत साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड आणि शार्पलाइन ब्रॉडकास्ट लिमिटेड या दोन कंपनाच्या शेअर्सच्या किंमती आणि व्हॉल्यूममध्ये अचानक लक्षणीय वाढ झाली होती. त्यानंतर साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड आणि शार्पलाइन ब्रॉडकास्ट लिमिटेडच्या शेअर्सच्या किमतीत फेरफार फेरफार झाल्याच्या तक्रारी सेबीकडे (SEBI) आल्या होत्या. त्यानंतर सेबीने पुढील तपास सुरु केला.

YouTube स्कॅम उघड –

SEBI ने केलेल्या तपासात समोर आले की, मे 2022 मध्ये मिडकॅप कॉल्स आणि प्रॉफिट यात्रा या दोन YouTube चॅनेलवरून साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड आणि Sharpline Broadcast Ltd बद्दलचे खोटे आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ उपलोड करण्यात आले होते. या व्हिडिओमध्ये गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी करण्यास प्रवृत्त करण्यासाठी शेअर्समध्ये ट्रेडिंग व्हॉल्यूम आणि जास्त परतावा देण्यासंबंधितची खोटी माहिती सांगण्यात आली होती. त्यानंतर साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड भागधारकांची संख्या 2,167 वरून 55,343 पर्यंत प्रचंड वाढली तर शार्पलाइन ब्रॉडकास्ट लिमिटेडच्या भागधारकांची संख्या 517 वरून 20,009 पर्यंत वाढली होती. त्यानंतर कंपनीला मोठ्या प्रमाणात नफा झाला.

…म्हणून कारवाई झाली

जास्तीचा परतावा मिळून देणारे खोटे आणि दिशाभूल करणाऱ्या YouTube व्हिडिओ मध्ये गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी करण्यास प्रवृत्त केले, ज्यामुळे PFUTP (फसवणूक आणि अनुचित व्यापार पद्धतींचा प्रतिबंध) च्या तरतुदींचे उल्लंघन झाले. त्यामुळे अर्शद वारसी आणि त्याच्या पत्नीसह इत्तर एकूण 45 जणांवर सेबीने कारवाई केली आहे. तसेच व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जमा झालेला 54 कोटींचा बेकायदेशीर नफाही जप्त केला आहे.

अर्शद वारसीला झाला लाखोंचा नफा –

सेबीने दिलेल्या माहितीनुसार, अर्शद वारसीला 29.43 लाख, मारिया गोरेटीने 37.56 लाखांचा नफा आणि इक्बाल हुसैन वारसीला 9.34 लाखांचा नफा हा You Tube व्हिडीओ उपलोड केल्यापासून झाला आहे.

SEBI ने आता अर्शद वारसीसह या घोटाळ्यात सामील असणाऱ्या सर्वाना “पुढील आदेश मिळेपर्यंत कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सिक्युरिटीज खरेदी, विक्री किंवा व्यवहार करण्यापासून” बॅन केलं आहे. याव्यतिरिक्त, जप्त केलेली रक्कम एस्क्रो खात्यात (Escrow Account) जमा होईपर्यंत सेबीच्या परवानगीशिवाय बँक खात्यातील पैशांसह कोणत्याही मालमत्तेची विल्हेवाट लावू नये, असे निर्देश संस्थांना देण्यात आले आहेत.

Related Articles

My Mandi Startup : भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी..

My Mandi Startup : भाजी आपल्या सोयीच्या वेळेत घरी डिलिव्हर व्हावी, ती...

Butt Baby Carrier : आकाश आणि रुची ह्या दाम्पत्याचा अनोखा स्टार्टअप

Butt Baby Carrier : आकाश आणि रुचीला असं लक्षात आलं की भारतातले...

Hypothalamus : Healthy meal delivery service : पेशंट हीच गिऱ्हाईकं

Hypothalamus : Healthy meal delivery service : डाएट हीच आयडिया घेऊन मुंबईत...