Post Office Monthly Income Scheme : कमी जोखमीच्या पर्यायांमध्ये केलेली गुंतवणूक केव्हाही फायदेशीर ठरते.
त्यात पोस्ट ऑफिस मध्ये केलेली गुंतवणूक हा बचत करण्याचा एक खात्रीशीर पर्याय आहे.
कारण पोस्ट ऑफिस मधील गुंतवणूक सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी आहे. पोस्ट ऑफिस मध्ये बऱ्याच बचत करण्यासाठी गुंतवणुकीच्या योजना आहेत.
ज्यामध्ये बचतीवर चांगला परतावा मिळतो. आज आम्ही अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.
Post Office Monthly Income Scheme : पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही नोकरदारांसाठी बचत करण्याचा एक उत्तम खात्रीशीर पर्याय आहे. तर ही योजना नेमकी काय आहे? समजून घेऊयात…
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये गुंतवणूकदारांना दरमहा एक ठराविक रक्कम किंवा एक निश्चित केलेली रक्कम जमा करायची आहे.
या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे. तसेच 31 डिसेंबरच्या आत तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला 7.40% इतके व्याजदर मिळणार आहे.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये गुंतवणूक कशी करायची?
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे पोस्ट ऑफिस बचत खाते असणे आवश्यक आहे.
किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते नसल्यास गुंतवणूक कशी करायची? जाणून घ्या
तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून या योजनेचा फॉर्म घ्या.
नंतर आयडी पुरावा (आधारकार्ड) पत्त्याच्या पुरावा, 2 पासपोर्ट फोटो या कागदपत्रांसह फॉर्म सबमिट करा
जास्तीत जास्त किती गुंतवणूक करू शकता?
व्यक्तींच्या खात्यांच्या संख्येवर मर्यादा नसली तरी, सर्व POMIS खात्यांमध्ये एकत्रितपणे गुंतवलेल्या कमाल रकमेवर मर्यादा आहेत.