Personal Loan : वैयक्तिक कर्ज/पर्सनल लोन हा प्रकार असुरक्षित कर्जाच्या सर्वात लोकप्रिय प्रकारांपैकी एक आहे. मागणी नंतर त्वरित पुरवठा केला जाणारा कर्ज प्रकार. आपत्तीजनक घटना, सहल, मुलांच्या शिक्षणासाठी, कौटुंबिक विवाह किंवा अगदी वैयक्तिक इतर खर्च कारणांसाठी पर्सनल लोन Personal Loan घेता येते. पर्सनल लोन वेगवेगळ्या बँका आणि NBFC द्वारे दिले जाते. मात्र कर्ज घेतलेली रक्कम प्रत्यक्षात कशी वापरली जाते यावर कोणतेही बंधन नाही; कर्जदाराला त्याने निवडलेल्या कोणत्याही कारणासाठी पैसे वापरण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. ह्याच कारणामुळे पर्सनल लोनचे व्याजदर चढे असतात.
Personal Loan वैशिष्ट्ये आणि फायदे –
1) – विनातारण मिळणारे कर्ज
2) – कोणत्या कारणासाठी वापरायचे ह्यावर बंधन नाही
3) – परफेडीचा कालावधी जास्तीत जास्त 60 महिने असू शकतो
4) – कमीतकमी कागदपत्रांच्या आधारे कर्ज मिळते
5) – फास्ट प्रोसेस होत असल्याने कर्ज पटकन मिळते
Personal Loan साठी पात्रता –
1) – अर्जदाराचे वय कमीतकमी 18 अन जास्तीतजास्त 60 असावे.
2) – मासिक पगार कमीतकमी रुपये 15000 असावा.
3) – क्रेडिट स्कोअर (सिबिल) हा 750 च्या पुढे असावा.
4) – व्यावसायिक असल्यास एकसलग दोन वर्षे व्यवसाय केल्याचा पुरावा
कमी प्रक्रिया शुल्क, आकर्षक व्याजदरांसह, बँका अल्प-मुदतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक कर्ज देतात. पर्सनल लोनसाठी कुठे अर्ज करायचा हे ठरविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विविध बँकांच्या योजनांची पडताळणी करून उपलब्ध डीलची स्पष्ट माहिती मिळाल्यावर तुमची आर्थिक स्थिती आणि गरजा कोणत्या गटात बसतात ह्याचा सारासार विचार करून पर्सनल लोन घ्यावे.
Personal Loan नाकारण्याची काही फिक्स अशी महत्वाची कारणे आहेत. –
1) क्रेडिट स्कोअर कमी असणे किंवा निगेटिव्ह असणे
2) रोजगाराची खात्री नसणे / अस्थिर कमाई असल्यास
3) नोकरी ज्या ठिकाणी करीत आहोत अशी कंपनी नोंदणीकृत नसल्यास
4) आधी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात सातत्य नसल्यास.
Personal Loanच्या मंजुरीसाठी प्रत्येक बँकेचे स्वतःचे पात्रता निकष तसेच नियम आहेत. त्याचप्रमाणे, Personal Loan नाकारण्याची कारणे बँकांच्या निकषानुसार बदलू शकतात.
कोणतेही कर्ज घेताना आपल्या गरजाआणि आवश्यकता ह्याचा मेळ आपल्या कमाईशी घालून मगच कर्ज घेण्यासाठी अर्ज करावा.