Tuesday , 21 May 2024
Home FinGnyan Payment Apps and e-Wallets : पेमेंट ॲप्स आणि इ-वॉलेट यांमधला फरक काय?
FinGnyan

Payment Apps and e-Wallets : पेमेंट ॲप्स आणि इ-वॉलेट यांमधला फरक काय?

Payment Apps and e-Wallets
Payment Apps and e-Wallets

Payment Apps and e-Wallets : पेमेंट ॲप्स किंवा ई-वॉलेट किंवा मोबाइल वॉलेट हे शब्द आता परवलीचे झालेत.

पेमेंट करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सेवा मोबाइल डिव्हाइस वापरून अश्या पेमेंट ॲप्स मधून दिल्या जातात.

रोख, चेक, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट करण्याची पद्धत आता covid काळानंतर फारच कमी झाली आहे.

मोबाइल वॉलेट किंवा मोबाइल मनी ट्रान्सफर (Money Transfer) वापरून प्रत्यक्ष व्यवहार करण्यात अगदी सर्वसामान्य माणसे सुद्धा आघाडीवर दिसत आहेत.

मोबाईल पेमेंट ही संकल्पना हळूहळू जगभरात वेगवेगळ्या प्रकारे स्वीकारली गेली आहे. ‘मोबाइल पेमेंट सिस्टम’ ह्या नावाने केलेले पहिले पेटंट इस 2000 मध्ये दाखल केले गेले.

Payment Apps and e-Wallets : पेमेंट ॲप्स कश्याप्रकारे काम करतात?

कोणताही व्यवहार करण्यापूर्वी पेमेंट ॲप्समध्ये तुमच्या बँक खात्यातून पैसे जमा केले जाऊ शकतात किंवा काही ठिकाणी आर्थिक व्यवहार करण्यासाठी एखाद्या व्यक्तीचे बँक खातेच डिजिटल वॉलेटशी (Digital wallet) जोडले जाते. पेमेंट ॲप्समध्ये सॉफ्टवेअर आणि इन्फोर्मेशन हे दोन्ही घटक सुरक्षित इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टम (Electronic Payment System) करण्यासाठी वापरले जातात. ॲप्समधले सॉफ्टवेअर वैयक्तिक माहितीसाठी आणि व्यवहार करण्यासाठी सुरक्षितता आणि एन्क्रिप्शन पुरवते.

What is e-Wallet? : इ वॉलेट किंवा मोबाईल वॉलेट म्हणजे काय?

मोबाइल वॉलेट किंवा ई वॉलेट ॲप्स ज्यामध्ये तुमची डेबिट आणि क्रेडिट कार्ड (Debit and Credit Card) माहिती असते जी मोबाइल डिव्हाइसचा वापर करून वस्तू आणि सेवांसाठी डिजिटल पद्धतीने पैसे देण्यास मदत करते.

Payment Apps and e-Wallets : भारतातील लोकप्रिय मोबाईल वॉलेट्स / इ-पेमेन्ट ॲप्स –

Paytm, Google Pay, Amazon Pay, JIO Money, Yono SBI, Airtel Money
Payzapp, MobiKwik, Oxigen, Ola money, PhonePe
PayUmoney, ICICI Pockets

इ वॉलेट्सचे फायदे –

  • झटपट पेमेंट्स करता येते
  • बिलाचे होणारे पेमेंट सुलभरित्या आणि जलद गतीने होते
  • झटपट डाउनलोड करून रजिस्टर करता येणे सोपे असल्याने वापर करणे सोयीचे
  • सुरक्षित पेमेंट गेटवे असतात
  • कूपन, बक्षिसे, सवलती मिळत असल्याने कस्टमरचा फायदा होतो

डिजिटल पेमेंट सिस्टीम (Digital Payment System) वापर करणाऱ्या देशात भारत हा देश आघाडीवर आहे. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवावी ती म्हणजे कुणाकडूनही पैसे घेत असताना (Receive करताना) OTP येत नाही आणि कोणताही कोड स्कॅन करावा लागत नाही.

Related Articles

A Rise of Bata Footwear : बाटा फुटवेअरचा उल्लेखनीय उदय.

A Rise of Bata Footwear : एका शतकापूर्वीच्या सुरुवातीपासून ते आजच्या जागतिक...

Wipro Industries Soaring to New Heights : विप्रो इंडस्ट्रीजची यशोगाथा

Wipro Industries Soaring to New Heights : जागतिक तंत्रज्ञान आणि वाढत्या गतिमान...

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची एक यशोगाथा

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची सुरुवात कशी झाली?...