Narayan Murthy : व्यवसायाची सुरुवात ही खडतरचं असते. खरतर व्यवसायाचा पाया रचला जातो आपल्या व्यवसायाला एक नवी ओळख निर्माण होते. या विचाराने फक्त सात मित्रांनी अवघ्या दहा हजारांत बंगलोरमध्ये आपला स्टार्टअप उभा केला. तो स्टार्टअप फक्त उभाच नाही राहिला तर त्या स्टार्टअपने भारतातील 2 नंबरची सर्वात मोठी आयटी कमी म्हणून नावगौरव मिळवला. तो स्टार्टअप म्हणजे इन्फोसिस (Infosys).. याच इन्फोसिस कंपनीचे सर्वासर्वे संस्थापक म्हणजे नारायण मूर्ती.
नारायण मूर्ती (Narayan Murthy) यांनी मुंबई येथे सुरु असलेल्या एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया या परिसंवाद कार्यक्रमात स्टार्ट-अप सुरु करणाऱ्यांना आणि नव्या उद्योजकांना एक महत्वाचा सल्ला दिला आहे. तसेच सरकारविषयी देखील भाष्य केलं आहे.
काय म्हणाले Narayan Murthy ?
देशाच्या कोणत्याही राज्यात कानाकोपऱ्यात तुमचा व्यवसाय असो पण तुम्ही सरकारी योजनांच्या फंडिंगवर अवलंबून राहू नका. सरकारच्या भरवश्यावर अवलंबून राहिल्यास तुमच्या व्यवसायाची ग्रोथ होणार नाही. किंवा तुमच्या स्टार्टअपची व्याप्ती मर्यादित राहील. कारण सरकारी योजनांची अंबलबजावणी लवकर होत नाही. त्यामुळे नवीन उद्योजकांच्या हाती निराशा येते. म्हणून सरकारच्या नादी लागण्या ऐवजी दुसऱ्या पर्यायांचा अवलंब करा, असा सल्ला इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी स्टार्ट-अप सुरु करणाऱ्यांना आणि नव्या उद्योजकांना दिला आहे.
काही दिवसांपूर्वी चीन सरकारच केलं होत कौतुक –
नारायण मूर्तींनी पुणे येथे झालेल्या परराष्ट्र मंत्रालय आयोजित आशिया इकॉनॉमिक डायलॉग या कार्यक्रमात चीनचं कौतुक केलं होत. त्यांनी म्हटलं होत कि भारताला जलद निर्णय घेण्याची, घेतलेल्या निर्णयांची जलद अंमलबजावणी, त्रासमुक्त व्यवहार, व्यवहारात प्रामाणिकपणा आणि पक्षपात न करण्याची संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे,’ तसेच चीनचं कौतुक करताना त्यांनी सांगितलं कि भारत आणि चीन या दोन्ही देशांचा व्यावसायिक आकार 1940 च्या शेवटी समान होता, पण सध्या चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा सहा पटीने मोठी आहे, कारण त्यांनी ही संस्कृती आत्मसात केली आहे.