My Mandi Startup : दारावर हातगाडी घेऊन येणारा भाजीवाला हा सोय म्हणून 90च्या दशकात पाहिला जायचा.
मंडईत जाऊन भाजी आणणे हा त्याआधीच्या पिढीचा एक कार्यक्रम असायचा.
गेल्या काही वर्षात कुटुंब छोटी झाली आणि घरातली सगळीच माणसे व्यस्त झाली.
भाजी आपल्या सोयीच्या वेळेत घरी डिलिव्हर व्हावी आणि ती सुद्धा ताजी, स्वच्छ, निवडलेली ह्यासाठी 2022 मध्ये ग्वाल्हेर मध्ये एक स्टार्टअप सुरु झाला.
My Mandi Startup : भाजी विकण्याचा रक अनोखा स्टार्टअप
भरपूर शिकलेल्या आणि मोठ्या ठिकाणी कामाचा अनुभव असलेल्या २ मुलांनी एकत्र येऊन सुरु केलेला स्टार्टअप.
My Mandi नावाचा स्टार्टअप. भाजी थेट बांधावरून खरेदी करून पोहोच करायचा व्यवसाय.
मधली सगळी व्यवस्था बायपास करून रिटेल आउटलेट किंवा भाजी विक्रेते ह्यांच्यापर्यन्त पोहोचवण्यासाठीचा उपक्रम.
ह्याचा फायदा शेतकरी आणि अंतिम विक्रेते ह्यांना तर होतोच पण ग्राहकाला सुद्धा ताजा भाजीपाला मिळतो. तोही पूर्वीपेक्षा वाजवी दरात.
My Mandi ई मंडईसारखे काम करते. ह्या स्टार्टअप ला रतन टाटा नी सपोर्ट केला आहे.
पहिल्या वर्षभरात कोटीहून अधिक टर्नओव्हर नुसत्या ई-प्लॅटफॉर्म सारख्या व्यवसाय मॉडेल मधून झाला आहे.
आता एक जरा आश्चर्याची गोष्ट- ह्या स्टार्टअपची संस्थापक कोण आहे? ग्वाल्हेरच्या सिंधिया घराण्याचा राजकुमार, महाआर्यमान सिंधिया आणि त्याचा मित्र सुर्यांश राणा.
एवढ्या मोठ्या कुटुंबाची पार्शवभूमी असूनही स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा आणि त्यासाठी तंत्रज्ञान वापरावे, त्याचा फायदा शेतकरी वर्गाला व्हावा, छोटे विक्रेते ह्यातून सक्षम व्हावेत हा उद्देश डोक्यात ठेवून MyMandi हा स्टार्टअप सुरु झाला.
उत्पादने साधी नेहमीची, पण बिझनेस आयडिया जरा वेगळी.