LIC Scheme : गुंतवणूक करण्यासाठी बाजारामध्ये अनेक नवे पर्याय आहेत. तात्काळ फायद्यासाठी तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता परंतु अधिकच्या परताव्याची तुम्हाला दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे गरजेचे असते.
यातच दीर्घकालीन गुंवणूक करण्यासाठी एलआयसी (LIC) आपल्याला अनेक योजनांचा पर्याय देत असते.
आज आम्ही तुम्हाला असाच एका एलआयसीच्या योजनेबद्दल (LIC Plan) सांगणार आहोत ज्यात दरमहा फक्त 4000 गुंतवणूक केल्यानंतर 21 वर्षानंतर तुम्हाला तब्बल 30 लाखांपेक्षा जास्त परतावा मिळणार आहे.
नेमकी काय ‘ही’ योजना जाणून घ्या सविस्तर.
LIC Scheme : नेमकी काय ‘ही’ योजना?
एलआयसीचा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स प्लॅन (SIIP) आहे. या प्लॅनमध्ये गुंतवणूकदारांना मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक प्रीमियम या पार्यामार्फत 21 वर्षांपर्यंत गुंतवणूक करायची आहे.
हेही वाचा : अकौंटिंग मध्ये नेमकं काय करियर घडू शकते? जाणून घ्या.
या योजनेमार्फत 21 वर्षानंतर गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या तब्बल तीनपट परतावा भेटणार आहे.
समजा एखादा गुंतवणूकदार मासिक प्रीमियम भरणार असेल तर त्याला 4 हजार रुपये प्रति महिना गुंतवणूक करावी लागेल.
तसेच तिमाहीसाठी 12 हजार तर सहामाहीसाठी 22 हजार रुपये प्रीमियम भरता येऊ शकतो. यात ग्रेस पीरियडचा पर्यायही दिला आहे.
नेमका कसा मिळणार तिप्पट परतावा?
जर गुंतवणूकदार 21 वर्षांसाठी दरमहा 4000 रुपये प्रीमियम भरणार असेल तर त्याची 21 वर्षात 10 लाख 8 हजार रुपयांची गुंतवणूक होते.
त्यानंतर गुंतवणूकदाराला गुंतवणुकीच्या रकमेशिवाय जवळपास 35 लाख रुपये मिळतात.
यासोबतच SIIP (Systematic Investment Insurance Plan) या योजनेत गुंतवणूकदारांना 4 लाख 80 हजार रुपयांचं इन्शुरन्स कव्हरही मिळतो.
21 वर्षांसाठी मासिक 4000 रुपये प्रीमियम भरला जात असेल, तेव्हा 10 लाख 8 हजार रुपयांची गुंतवणूक होते.
21 वर्षांनी पॉलिसीची मुदत संपेल तेव्हा गुंतवणुकीच्या रकमेशिवाय जवळपास 35 लाख रुपये मिळतात.
आपण गुंतवणूक केलेल्या रकमेच्या तुलनेत ही रक्कम तिप्पट अधिक आहे. SIIP योजनेत गुंतवणूकदारांना 4 लाख 80 हजार रुपयांचं इन्शुरन्स कव्हरही दिलं जातं.
या प्लॅनमध्ये गुंतवणुक करण्यासाठी किंवा अधिकच्या माहितीसाठी तुम्ही जवळच्या एलआयसी कार्यालयाला (LIC Office) भेट देऊ शकता.