Gold Silver Price : कोरोनानंतरच्या या लग्नाच्या सीझनमध्ये लोकांचा सोने-चांदी (Gold silver) खरेदीकडे जास्त कल असल्याचा पाहायला मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून हा दर सातत्याने वाढताना दिसत आहे. सोन्याचे भाव (gold Price) सातत्याने का वाढत आहेत याची काही वेगवेगळे करणं आहेत.
सोन्याच्या किमतीने उच्चांक ‘का’ गाठला?
सध्या गुंतवणुकीच्या क्षेत्रात अस्थिरतेचं वातरण होत. मुख्यतः शेअर बाजारामध्ये (Share Market), त्यामुळे या काळात गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीमध्ये गुंतवणुक करण्यात जास्त भर दिला. त्यामुळे मागणी वाढल्याने काही अंशी सोन्याचे भाव वाढले आहे.
तसेच यावर्षी लग्न सोहळे मोठया उत्साहात संपन्न होत आहेत. त्यामुळे लग्न कार्यांसाठी मोठया प्रमाणात सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरांना सध्या चढता क्रम लागलेला आहे. काही दिवस सोन्याला तेजी असणार आहे पण येत्या काही काळात सोन्याचे भाव खाली येतील असं मत सराफा बाजारातील काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.
सोन्याच्या किमतीमध्ये घट
मागील 10 दिवसांचा विचार केला तर सोन्याच्या दरात जवळपास 1000 रुयांपर्यंत घसरण झाली आहे. 58 हजारांच्या पलीकडे गेलेले सोन्याचे दर आता 57,300 रुपयांर्यंत झाली आले आहेत.सोन्याच्या दारात शुक्रवारी भाव वाढ झाली होती.
आजचे सोन्या चांदीचे दर –
त्यानंतर सोन्याचे भाव स्थिर होते. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा दर (24K Gold price) प्रतितोळा 57,300 वर पोहोचले आहे. मागील दीड ते दोन महिन्यात सोनं तब्बल दोन हजार रुपयांनी महाग झालं आहे. तसेच चांदीच्या दारात देखील घसरण पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी 72 हजारांच्या पुढे असलेले चांदीचे भाव सध्या 70,500 रूपये एवढे आहे.