Tuesday , 18 June 2024
Home FinNews Electric SUV Scooter : बेंगळुरूच्या इलेक्ट्रिक स्टार्ट-अप कंपनीची कमाल; देशातील पहिली इलेक्ट्रिक SUV Scooter लॉन्च.
FinNews

Electric SUV Scooter : बेंगळुरूच्या इलेक्ट्रिक स्टार्ट-अप कंपनीची कमाल; देशातील पहिली इलेक्ट्रिक SUV Scooter लॉन्च.

Electric SUV Scooter : “झुक झुक झुक झुक आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी, पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया” जुन्या काळातील दळणवळणाच्या साधनांचा विचार केला तर हे गाणं लगेच डोळ्यासमोर येत. एक तो काळ होता जिथे दळणवळणाची साधने मोजकीच होती. सटी, आगगाडी सारखे साधने जणू माणसांच्या शरीरातील रक्तवाहिन्या होत्या. साधने नक्कीच कमी होती पण झाडाखालच्या पारावर विचारांची देवाणघेवाण मात्र जोरात व्हायची. अलीकडे काळ बदलला तंत्रज्ञात नवनवीन प्रगती होत गेली. जसजसे तंत्रज्ञान बदलत गेले तसतसे वाहनं देखील बदलत गेले. मुख्य म्हणजे सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत वाहन निर्मिती होऊ लागली. त्यामुळे आज नाही म्हटलं तरी प्रत्येक घरात एक बाईक किंवा कार आहे.

कार किंवा बाईक घेणं जरी स्वस्त असलं तरी सध्या त्याला चालवणं परवडणार नाही. कारण पेट्रोल डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे बाजारात इलेक्ट्रिक बाईक्स व कार येऊ लागल्या आहे. सर्वसामान्यांसाठी इलेक्ट्रिक बाईक्स हा परवडणारा विषय आहे. इलेक्ट्रिक बाईक पेट्रोल 10 टक्के इंधनखर्च कमी करतो. त्यामुळे सर्वांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. त्यामुळे अलीकडच्या 2 वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. बाजारातील याच संधीचं सोन करण्यासाठी अनेक स्टार्ट-अप कंपन्या बाजारात उतरल्या आहेत. अशातच बेंगळुरूच्या ‘रिव्हर’ या इलेक्ट्रिक स्टार्ट-अप (Start-up) कंपनीने देशातील पहिली इलेक्ट्रिक SUV स्कूटर लॉन्च (Electric SUV Scooter) केली आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक SUV स्कूटरमध्ये (Electric SUV Scooter) अनेक फीचर्स दिले आहेत. कशी आहे ही स्कुटर ? जाणून घेऊयात…

Electric SUV Scooter : जबरदस्त स्पेस

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, River Indie स्कुटरमध्ये 43-लिटर बूट स्पेस आणि 12-लीटर ग्लोव्ह बॉक्स स्पेस आहे.

Electric SUV Scooter : पॉवर रेंज

River Indie स्कुटरमध्ये 4 kWh बॅटरी पॅकसह 6.7 kW पॉवरची इलेक्ट्रिक इंजिन आहे. तसेच या बाईकची 120 किमी पर्यंत रेंज आहे. तसेच या बाईकचा 90 किमी/तास हा टॉप स्पीड आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर (River Indie Electric Scooter) 5 तासात 0 ते 80 टक्के चार्ज होते.

Electric SUV Scooter : किंमत (Price)

River Indie या इलेक्ट्रिक स्कुटरची सुरवातीची किंमत 1 लाख 25 हजार 000 रुपये आहे. कंपनी या स्कूटरची डिलिव्हरी या वर्षी ऑगस्ट 2023 मध्ये सुरू करू शकते.

Related Articles

Banknotes with star symbol : ‘स्टार’ चिन्ह असलेल्या नोटा कायदेशीर आहेत का?

Banknotes with star symbol : ‘स्टार’ चिन्ह असलेल्या नोटा काय आहेत? ते...

Highest Tax paying Indian Celebrities : उच्च Tax भरणारे भारतीय सेलिब्रिटी

Highest Tax paying Indian Celebrities : अनेक सेलिब्रिटी दरवर्षी करोडो रुपये कमावतात...

Government Reduces GST Rate : मोबाईलसह अनेक गृहोपयोगी वस्तूंच्या जीएसटीमध्ये कपात.

Government Reduces GST Rate : मोबाईल, टीव्हीसह अनेक गृहोपयोगी वस्तूंच्या जीएसटीमध्ये मोठी...