Butt Baby Carrier : लहान लेकरू पाहिलं की लगेच उचलून कडेवर घ्यावे वाटते. मात्र कडेवर घेऊन उभं राहणे किंवा फिरणे फार वेळ शक्य होत नाही.
त्यात कमरेचा किंवा पाठीचा काही त्रास असल्यास तर अवघडच होतं. आपलंच लेकरू असेल तर मात्र दुखणं मागे लागतं कडेवर घेऊन घेऊन.
कॉम्प्युटर इंजिनियर असलेल्या आकाश आणि रुची ह्या दाम्पत्याला हा प्रश्न जास्त भेडसावत होता.
कोव्हीडनंतर आकाशला पाठीच्या कण्याला त्रास जाणवू लागला आणि त्याला त्याच्याच लेकरांना कडेवर घेणे अवघड होऊ लागले.
बाजारात उपलब्ध असणाऱ्या मुलांना कॅरी करण्याच्या गोष्टी तितक्याशा सोप्या नाहीयेत हे ही लक्षात आलं.
Butt Baby Carrier : आकाश आणि रुची ह्या दाम्पत्याचा अनोखा स्टार्टअप
आकाश आणि रुची ह्या दोघांनी नीट रिसर्च करून एक मोठी गॅप शोधून काढली.
गॅप… व्यवसाय करण्यापूर्वी सद्यस्थितीत मार्केट मध्ये काय आहे आणि आपण कोणता प्रश्न सोडवणार आहोत ह्याची तफावत शोधून काढणे.
आकाश आणि रुचीला असं लक्षात आलं की भारतातले बेबी केअर प्रॉडक्टचे मार्केट दरवर्षी साधारण 50 कोटीहून अधिक वाढत जाणारे आहे.
दोघांनी खिशातले 4 लाख घालून ButtBaby नावाने ब्रँड सुरु केला.
मुलांना कडेवर घेण्यासाठी एक बेल्ट असलेले प्रॉडक्ट. दिसायला साधेसे पण त्याचा आरोग्यदृष्टया विचार करून कडेवर घेणाऱ्याला आणि कडेवर बसलेल्याला कुठलाही त्रास / अवघडलेपण येऊ नये ह्यासाठी डिझाईन केलेलं प्रॉडक्ट.
सुरुवातीला केवळ आणि केवळ सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटींगचा वापर करून प्रॉडक्ट विक्री करायला सुरुवात केली.
इंस्टाग्राम आणि स्वतःची website वरून विक्री करून त्यांनी मार्केट सेट केले.
रिसर्च करून त्याच्या टेस्ट्स घेऊन ButtBaby चे प्रॉडक्ट सेट झाले आहे.
आज ButtBaby ची उलाढाल 23-24 वर्षातली पाहिल्यास ती 6 कोटींच्यावर गेलेली दिसेल. येत्या 2 वर्षात अजून 15-20 प्रॉपर रिसर्च केलेले प्रॉडक्ट्स ते लाँच करणार आहेत.
उत्पादने साधी नेहमीची, पण बिझनेस आयडिया जरा वेगळी.