What is Internet Banking? : इंटरनेट बँकिंग म्हणजे एक अशी इलेक्ट्रॉनिक पेमेंट प्रणाली जी बँक किंवा इतर वित्तीय संस्थेच्या ग्राहकांना वित्तीय संस्थेच्या वेबसाइटद्वारेच अनेक प्रकारचे आर्थिक व्यवहार करण्यास सक्षम करते.
इंटरनेट बँकिंगला ऑनलाइन बँकिंग, ई-बँकिंग किंवा आभासी बँकिंग म्हणूनही ओळखले जाते.
इंटरनेट बँकिंग (Internet Banking) हा एक अत्यंत महत्वाचा शोध आहे. जवळजवळ सर्वच क्षेत्रांमध्ये आणि उद्योगांमध्ये इंटरनेट बँकिंगची उपस्थिती गेम-चेंजर असल्याचे सिद्ध झाले आहे.
हेही वाचा : This rules will change from 1 August 2023 : ऑगस्टपासून ‘या’ नियमांत होणार बदल.
गेल्या काही वर्षांत बँकिंगमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. इंटरनेट बँकिंग आणि पैसे ऑनलाइन ट्रान्सफर (online transfer) केल्याने टिपिकल बँकिंग जवळजवळ संपुष्टात आले आहे.
आज पारंपारिक बँकिंगने नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
What is Internet Banking? इंटरनेट बँकिंगचे फायदे –
- बँक खाते उघडणे सोपे आणि ऑनलाइन मोडद्वारे ऑपरेट करणे सोपे आहे.
- इंटरनेट बँकिंगच्या साहाय्याने क्रेडिट कार्डची, कर्जाची थकबाकी सहजपणे भरता येते
- एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे हस्तांतरित करता येतात
- युटिलिटी बिले भरता येतात, मोबाईल रिचार्ज करून घेता येतो आणि असे बरेच काही करता येते.
- इंटरनेट बँकिंग कोणत्याही दिवशी चोवीस तास उपलब्ध असते
- जगाच्या कोणत्याही भागातून इंटरनेट बँकिंग वापरता येते
- वापरण्यास जलद आणि कार्यक्षम आहे
- इंटरनेट बँकिंगद्वारे अनेक खाती सहजी हॅन्डल करता येतात
- खात्यातले पैसे काढणे किंवा जमा केल्यावर रीअल-टाइम डेटा जाणून घेतल्याने व्यवहार आणि खात्यातील शिल्लक यावर नियमित लक्ष ठेवता येते.
इंटरनेट बँकिंग हे बँकांसाठी त्यांची उत्पादने आणि सेवा वापरणाऱ्याना मान्यता देण्याचे एक मोठे माध्यम आहे.