Public Provident Fund : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF).
भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या राष्ट्रीय बचत संस्थेने (National Savings Institute) 1968 मध्ये सुरू केलेली योजना म्हणजे पीपीएफ.
भारतातील जनतेसाठी बचत आणि कर बचतीकरीत प्राधान्याने वापरली जाणारी योजना म्हणून पीपीएफकडे पाहिले जाते.
सदरील योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे टॅक्स सेव्हिंग आणि वाजवी परताव्यासह गुंतवणूक ऑफर असा डबल फायदा छोट्या गुंतवणूकदारांना मिळवून देणे हा आहे.
Public Provident Fund : PPF मधील गुंतवणूक फायदेशीर
PPF मधील गुंतवणूक ही दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.
PPF मध्ये केलेली गुंतवणूक ही इन्कमटॅक्सच्या सेक्शन 80C अंतर्गत टॅक्समधून सवलत मिळवून देणारी असते.
Public Provident Fund : कर्ज देखील घेऊ शकता
PPF खात्यात असलेल्या शिलकीवर कर्ज देखील काढता येते. पीपीएफ खात्यामध्ये गुंतवणुकीवर 15 वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो, त्यापूर्वी संपूर्ण निधी एकाचवेळी काढता येत नाही.
आवश्यकता वाटल्यास लॉक-इन कालावधी संपल्यानंतर गुंतवणूकदार सदरील कालावधी 5 वर्षांनी वाढवू शकतो. दर महिन्याला किमान रु. 500 एका आर्थिक वर्षात कमाल 1.5 लाख रुपये PPF खात्यात गुंतवता येतात.
ही गुंतवणूक मासिक पातळीवर म्हणजे दर महिन्याला थोडी थोडी करून करता येते किंवा एकाच वेळी PPF खात्यात संपूर्ण वर्षाची रक्कम टाकता येते.
PPF खाते कायमस्वरूपी ऍक्टिव्ह राहण्यासाठी दरवर्षी पीपीएफ खात्यात काही ना काही गुंतवणूक करावीच लागते.
हेही वाचा : Indian Car Industry : भारतीय कार उद्योगातील प्रमुख टप्पे आणि घडामोडींचे विहंगावलोकन.
खाते कधी उघडू शकतो?
नागरिकत्वाच्या कायद्यानुसार फक्त भारतीय नागरिक त्यांच्या नावाने PPF खाते उघडू शकतात. 18 वर्षाच्या आतल्या (अल्पवयीन) मुलांना त्यांच्या नावावर त्यांचे पालक सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते उघडू शकतात.
मूल सज्ञान झाल्यावर त्याचे अकाउंट कागदपत्रे पुन्हा जमा करून पडताळून घ्यावे लागते जेणे करून मग ती सज्ञान झालेली व्यक्ती ते अकाउंट हाताळू शकेल.
एखादी व्यक्ती सरकारी बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये फक्त एकच PPF खाते उघडू शकते.
ह्या देशात राहणाऱ्या प्रत्येकाने PPFखाते उघडले पाहिजे आणि बचतीची सवय लावून घेतली पाहिजे.