Types of Banks : बँक म्हंटल की सर्वांच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा येते ती सरकारी बँक अन मग खाजगी बँक. पण बँक म्हणजे काय तसेच बँकांचे प्रकार कोणते तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या याबद्दलची सविस्तर माहिती.
What is Bank : बँक म्हणजे काय?
“बँका म्हणजे अश्या वित्तीय संस्था ज्या ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देण्याचे कार्य करतात.” भारतात विविध प्रकारातल्या बँका आहेत आणि वेगवेगळी कार्ये करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.आर्थिक गोष्टींसाठी आपण अनेकदा बँकाच्या पायऱ्या चढउत्तर करत असतो. बँक ही बँक असते तर त्यात प्रकार असे काय असतात? मग भारतात बँकांचे नेमके किती प्रकार आहेत हे जाणून घेऊयात…
हेही वाचा : भारत सरकार ‘या’ कंपनीमध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या.
Types of Banks : भारतात बँकांचे नेमके किती प्रकार आहेत?
1) देशाची केंद्रीय वित्तीय संस्था किंवा सेंट्रल बँक ऑफ कंट्री
2) सहकारी बँक किंवा को-ऑपरेटिव्ह बँक
3) व्यावसायिक बँक किंवा कमर्शिअल बँक (ह्यामध्ये परत काही उपप्रकार आहेत)
4) प्रादेशिक ग्रामीण बँक किंवा रिजनल रूरल बँक
5) स्थानिक क्षेत्रीय बँक किंवा लोकल एरिया बँक
6) विशेष बँक किंवा स्पेशलाइज्ड बँक
7) लघुवित्त बँक किंवा स्मॉल फायनान्स बँक
8) पेमेंट्स बँक (अगदी अत्याधुनिक प्रकार)
वर उल्लेखलेल्या बँकांच्या प्रकारात सर्वांची प्रमुख कार्ये जवळजवळ सारखीच असतात, फक्त क्षेत्र आणि अधिकार वेगवेगळे असतात. प्रत्येक प्रकारातल्या बँकांची कार्ये नेमकी कोणती आणि त्यांची उदाहरणे कोणती ह्याची माहिती आपण पुढील लेखात पाहणार आहोत.