Why Health Planning is Important? : आरोग्यम धनसंपदा असं भारतीय मानसिकता मानते. पण खरंच किती भारतीय आरोग्यासाठी म्हणून सजग असतात?
HDFC LIFE ने केलेल्या एका सर्व्हेक्षणानुसार असं लक्षात आलं आहे की, सर्व आर्थिक गटातल्या भारतीयांमध्ये आरोग्य नियोजनाचा (Health Planning) अभाव आहे.
ह्यामध्ये विशेषतः तरुण मंडळी जास्त आहेत.
हे सगळं सर्वेक्षणात लक्षात आलं, कारण ज्या ज्या लोकांचे इन्श्युरन्स करण्यात आले त्यात आरोग्यावर जी मंडळी नीट लक्ष देत नाहीत, जी लोकं आरोग्याबाबत दक्ष नसतात त्यांना इन्श्युरन्स प्रीमियम जास्त भरावा लागतो.
जर योग्य व्यायाम, संतुलित आहार, व्यसनांपासून चार हात दूर असणारे तसेच नियमित हेल्थ चेकअप करणाऱ्या लोकांना इन्श्युरन्स करत असताना विशेष लाभ मिळतो.
आजार असल्यास, व्यसन करत असल्यास, हेल्थ चेकअपमध्ये एखादी गोष्ट समोर आल्यास इन्श्युरन्सच्या प्रीमियममध्ये वाढ होते.
कमी वय कमी प्रीमियम हा जरी सोपा नियम असला तरी आजकाल अनेक मोठ्या रकमेच्या पॉलिसी काढत असताना डिटेल्ड हेल्थ चेकअप करण्याचा सल्ला अनेकांना दिला जातो.
त्यात काही आढळल्यास प्रीमियमची रक्कम बदलते.
सर्व्हेक्षणानुसार केवळ 9 टक्के लोकांनीच सर्वसमावेशक आरोग्ययोजना म्हणजे हेल्थ बेनेफिट प्लॅन्स मध्ये गुंतवणूक केलेली आहे.
आपलं आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित आणि निरोगी आयुष्यासाठी आपणच पुढाकार घेणे आवश्यक आहे.
Why Health Planning is Important? हेल्थ प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय..?
तर नियमित व्यायाम, सुयोग्य आहार, व्यसने न करता हेल्दी लाईफस्टाईल अवलंबणे आणि त्याच सोबत दीर्घकालीन हेल्थ इमर्जन्सीसाठी गुंतवणूक करणे.
ह्या सगळ्या गोष्टी हेल्थ प्लॅनिंग मध्ये समाविष्ट होतात. सर्वांनी ह्यासंदर्भात काळजी घ्यावी.
कोव्हीडच्या काळात आपण सर्वांनी ह्या अनपेक्षित अचानकपणे समोर आलेल्या हेल्थ इमर्जन्सीचा प्रताप पाहिला आहेच.
Precaution is always better than cure असं म्हणतात ते खरंच आहे.