Zero Balance Account : लोक सहसा साठवलेले पैसे बँकेच्या बचत खात्यामध्ये (Savings Account) ठेवतात. मुख्यतः बँकेत ठेव ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्ही कमावलेले किंवा वाचवलेले पैसे जर बँकेत जमा केले तर तुम्हाला चांगला परतावा देखील मिळतो. तसेच सरकारच्या योजनांमुळे 2014 ते 2019 या कालावधीत बँकेच्या बचत खात्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती, या काळात बँक 100 ते 1000 रुपयांच्या ठेवींवरती बचत खाते उघडत होत्या. पण सध्या नवीन नियमांनुसार बचत खाते उघडण्यासाठी तब्बल 5 हजार ते 10 हजार रुपये लागतात. तसेच एवढी रक्कम आपल्या बँक खात्यात कायम असावी लागते. नाहीतर बँक यावरती दंड आकारते. ही बाब सर्वसामान्य जनतेला परवडणारी नाहीये. पण सध्या काही बँकांनी “झिरो बॅलन्स अकाउंट” म्हणजे शून्य-शिल्लक खाते (Zero Balance Account) ही योजना आणली आहे. या योज़ने योजने अंतर्गत कोणतीही रक्कम ठेव न ठेवता बँकेत आपल्याला अकाउंट उघडता येते. यासोबत आणखीही काही सुविधा बँकेकडून मोफत दिल्या जातात. आता झिरो-बॅलन्स खाते म्हणजे काय? झिरो-बॅलन्स खात कसं उघडायचं? जाणून घ्या सविस्तर.
Zero Balance Account : झिरो-बॅलन्स खाते म्हणजे काय?
झिरो-बॅलन्स अकाउंट (Zero Balance Account) म्हणजे असे बचत बँक खाते (Savings Bank Account) की ज्यामध्ये शून्य शिल्लक (zero balance) आहे आणि तरीही शुल्क आकारले जात नाही. तसेच झिरो-बॅलन्स अकाउंट कोणतेही चार्जेस लागत नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वानुसार हे कायदेशीररित्या मूलभूत बचत बँक ठेव (BSBD) खाते म्हणून ओळखले जाते. लोकांमध्ये अधिक बचत करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी बँकांद्वारे ही सुविधा दिली जाते. झिरो-बॅलन्स अकाउंट उघडल्यावर खातेधारकाला बँकेचं पासबुक (Bank passbook), डेबिट कार्ड (Debit Card), तसंच मोबाइल व इंटरनेट बँकिंगची सुविधा (Mobile and internet banking facility) बँकेकडून मोफत दिली जाते.
तुम्ही झिरो-बॅलन्स खात्यात गुंतवणूक का करावी?
शून्य शिल्लक खाते उघडण्याचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत :
किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही –
खातेधारकांना शून्य शिल्लक किंवा किमान शिल्लक राखण्यासाठी शुल्क आकारले जात नाही. आदर्शपणे, ते अधिक बचत बँक खाते उघडण्यास आकर्षित करते.
बँकिंग सुविधांचा मोफत लाभ –
सर्व वैयक्तिक खातेधारकांना काही सुविधा मोफत दिल्या जातात. यामध्ये मोफत पासबुक आणि कोणत्याही शाखेत मोफत रोख आणि चेक डिपॉझिटचा समावेश आहे. तसेच मोबाइल व इंटरनेट बँकिंगची सुविधा मिळते यासोबत सेफ डिपॉझिट लॉकरची सुविधाही देण्यात आली आहे. या सुविधांसाठी आकारले जाणारे शुल्क नाममात्र आहे.
डिजिटल पेमेंटला परवानगी देते –
खातेधारकांना डिजिटल पेमेंट करण्यासाठी कार्ड दिले जाते. ही कार्डे ऑनलाइन पेमेंट सहज आणि सोयीस्करपणे करण्यासाठी RuPay सारख्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट गेटवे प्रणालीचा वापर करतात.
काही मर्यादाही आहेत.. याविषयीही जाणून घ्या –
झिरो बॅलन्स अकाउंट उघडण्याचे जसे फायदे आहेत ताशा मर्यादाही आहेत. झिरो बॅलन्स खात्यामध्ये खातेधारक वर्षाला 1 लाखांच्या आसपास रक्कम जमा करू शकता. त्यापेक्षा रक्कम जमा करायची असल्यास सेव्हिंग अकाउंटमध्ये रूपांतरित करावं लागतं. तसेच झिरो-बॅलन्स खात्यावर तुम्हाला दर महिन्याला मर्यादित व्यवहार करता येतात,
झिरो बॅलन्स अकाउंट कसे आणि कुठे उघडायचं?
तुम्हाला ज्या बँकेमध्ये झिरो बॅलन्स अकाउंट उघडायचं आहे त्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाणून खातं उघडण्यासंदर्भात पर्यायावर क्लिक करा. तसेच खालील लिंकद्वारे देखील तुम्ही झिरो बॅलन्स अकाउंट उघडू शकता
कोटक महिंद्रा बँक – https://bit.ly/3CkQGke
AU बँक – https://bit.ly/3MBNV0N
झिरो बॅलन्स अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्डची आवश्यकता लागेल.