अर्थ’ज्ञान : जर तुम्ही Google Pay किंवा इतर कोणत्याही UPI पेमेंट App वरून (UPI Payment App) पेमेंट करत असताना इंटरनेट बंद पडलं किंवा तुमच्याकडे स्मार्टफोन (Smartphone) नाहीये आणि तुम्हाला अर्जंट पेमेंट करायचं आहे तर आपली धावपळ उडते. तर अशावेळी धावपळ करण्याची कोणतीही गरज नाहीये. कारण असा परिस्थितीमध्ये तुम्ही USSD आधारित मोबाइल बँकिंग सेवेचा (Mobile Banking Service) वापर करू शकता. जाणून घ्या याबद्दलची संपूर्ण प्रक्रिया.
काय आहे USSD आधारित मोबाइल बँकिंग सेवा?
*99# या USSD आधारित नंबरवर असणारी सेवा प्रणाली देशभरातील सर्वांसाठी बँकिंग सेवा (Banking Service)प्रदान करते. हे 83 बँका (83 Bank) आणि 4 मोबाईल ऑपरेटरद्वारे (4 mobile operators)ऑफर केले जाते. तसेच इंटरनेटशिवाय UPI पेमेंटसाठी ((UPI Payment) प्रथम तुमचा नंबर UPI वर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे आणि तोच क्रमांक तुमच्या बँक खात्याशी जोडला (linked to your bank account) गेला पाहिजे.
*99# वापरून UPI पेमेंट कसे करावे ?
1) स्मार्टफोनवर (Smartphone) *99# हा कोड टाइप (Code Type) करून कॉल (Call) करा. नंतर तुम्हाला एक मेसेज (Text Massage) येईल.
2) त्यात तुम्हाला 7 नवीन options दिसतील. त्यात 1 नंबरचा पर्याय पैसे पाठवण्याचा आहे. त्यावर क्लिक करा.
3) ज्या व्यक्तीला तुम्हाला पैसे पाठवायचे आहे त्याचा नंबर टाकून पैसे पाठवण्याचा पर्याय निवडा.
4) आपल्या UPI अकाउंटशी संबंधित मोबाईल नंबर (Mobile Number) त्यात टाका आणि पैसे पाठवा वर क्लिक करा.
5) तुम्हाला जी रक्कम पाठवायची आहे तेवढी रक्कम तिथे टाका आणि नंतर तुमचा UPI पिन टाका.
6) पॉपअपमध्ये, तुम्हाला पेमेंटचे (Payment) कारण लिहावे लागेल.
7) ही सेवा मोफत नसून यासाठी तुम्हाला 50 पैसे शुल्क द्यावे लागणार आहे.
8) या प्रणालीद्वारे सध्या तुम्हाला फक्त 5000 रुपयांपर्यंतची रक्कम पाठवता येणार आहे.
दरम्यान, याद्वारे तुम्ही पैसे (Money) मागवू आणि पाठवू शकता, UPI पिन बदलू शकता आणि इंटरनेट कनेक्शनशिवाय खात्यातली रक्कम तपासू देखील शकता. (You can also check account balance without internet connection)