Monika Chaudhary founder of BownBee : लग्न झालं मुलबाळ झालं की बायकांचे आयुष्य एका चौकटीत बंद होते. असा सार्वत्रिक समज आहे.
पण लग्नाआधीपासूनच IT मध्ये जॉब (Job) करत असणारी मोनिका लग्नानंतरही जॉब करतच होती.
मुलगी झाल्यावर तीन वर्षांनी 2013 मध्ये मुलीच्या संगोपनासाठी तिने नोकरी सोडली. अनेकांनी म्हटलं आता संपलं तुझं करियर.
Monika Chaudhary founder of BownBee : Bow-N-Bee या लहानमुलांच्या कपड्यांचा ब्रँड सुरु
पण तिच्यातली उर्मी तिला शांत बसू देईना. मार्केटचा बराचसा अभ्यास करून आणि हिंमत करून 2015 ला तीन लाख गुंतवून तिने Bow-N-Bee हा लहानमुलांच्या कपड्यांचा (Ethnic Wear) ब्रँड सुरु केला. आज ह्या ब्रॅण्डचा टर्नओव्हर तीन कोटीहून जास्त आहे.
FirstCry, Amazon, Flipkart, Myntra, Hopscotch ह्या विविध online प्लॅटफॉर्मवरून आज Bow-N-Bee ह्या ब्रँडचे कपडे विकले जात आहेत.
भारतातल्या विविध ग्रामीण भागातल्या हस्त कलाकारांशी तिने भागीदारी करून त्यांचे डिझाइन्स वापरून मार्केटच्या गरजेनुसार कपडे तयार करून घेऊन Bow-N-Bee विक्री करत आहे.
सोशल+कमर्शिअल असा बिझनेसचा अनोखा जोड तयार करून मोनिका चौधरींनी एक चांगला मार्ग दाखवून दिला आहे.
Bow-N-Bee मध्ये डिझाईन, उत्पादन, विक्री प्रक्रिया ह्या सगळ्या कामात जवळपास 70 टक्के महिलाच काम करत आहेत.