Recession : मंदी हा एक असा आर्थिक शब्द आहे जो देश किंवा प्रदेशातील आर्थिक घडामोडींमध्ये लक्षणीय घट होण्याच्या कालावधीसाठीचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.
थोडक्यात देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) मध्ये घट, वाढती बेरोजगारी, ग्राहकवर्गाची खर्च करण्याची ताकद कमी होणे, घसरणारा व्यावसायिक नफा आणि एकूणच आर्थिक क्षेत्रातली मंदी.
मंदीच्या काळात, औद्योगिक उत्पादन, किरकोळ विक्री, गृहनिर्माण बाजारातील गोष्टी आणि व्यावसायिक गुंतवणूक यासारख्या विविध आर्थिक निर्देशकांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होते.
मंदीच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये काही महत्वाच्या गोष्टी समाविष्ट आहेत :
GDP मध्ये घट: GDP एका विशिष्ट कालावधीत देशात उत्पादित सर्व वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य मोजते.
मंदीमध्ये सलग दोन तिमाही किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी GDP मध्ये सतत घट होत असते.
Recession : बेरोजगारी
मंदीमुळे अनेकदा बेरोजगारीच्या दरात वाढ होते. कारण अनेक बिझनेसेस रोजच्या घडामोडी चालू ठेवण्यासाठी संघर्ष करतात.
तसेच त्यामध्ये काही कामगारांना काढून टाकून थोड्या लोकात व्यवसाय चालू ठेवावा लागतो.
आहेत त्यांना कढून टाकल्याने बाहेरचे बेरोजगार वाढत जातात. परिणामी लोकांना नवीन रोजगार मिळवणे आव्हानात्मक ठरते.
Recession : ग्राहकांची खर्च करण्याची ताकद कमी होणे
मंदीच्या काळात ग्राहक भविष्याबद्दल साशंक असतात. त्यामुळे अनेकदा छोट्या मोठ्या गोष्टी खरेदी करण्याचा विचार ते पुढे ढकलतात.
खर्चातील या कपातीचा अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांवर मोठा परिणाम व्हायला सुरुवात होते. ह्याचमुळे वस्तू आणि सेवांची मागणी कमी होते.
Recession : व्यवसायामधला नफा घसरतो
बाजारातील मागणीत घट झाल्यामुळे मंदीच्या काळात व्यवसायांना उत्पन्नात घट होऊन परिणामी नफा कमी होतो.
शेअर बाजारातील घसरण :
गुंतवणूकदार अधिक जोखीम-विरोधक बनतात आणि असलेले शेअर्स विकतात. परिणामी शेअर बाजारात अनेकदा लक्षणीय घसरण होते.
घसरत चाललेल्या शेअर बाजाराचा ग्राहक आणि व्यावसायिक आत्मविश्वासावर परिणाम होऊन, आर्थिक मंदी वाढते.
चलनविषयक धोरण प्रतिसाद :
अश्यावेळी बँका विशेषत: व्याजदर कमी करणे आणि पैशांचा पुरवठा वाढवणे यासारख्या विस्तारित आर्थिक धोरणांची अंमलबजावणी करून मंदीला सामोरे जातात.
सरकारी हस्तक्षेप :
मंदीच्या प्रभावांना तोंड देण्यासाठी सरकारे देखील वित्तीय धोरणे लागू करू शकतात.
या धोरणांमध्ये वाढीव सरकारी खर्च, कर कपात किंवा विशिष्ट उद्योग किंवा क्षेत्रांना समर्थन देण्यासाठी प्रोत्साहन उपायांचा समावेश असू शकतो.
मंदीचे लक्षणीय सामाजिक आणि आर्थिक परिणाम झाल्याचे आपल्याला दिसते. गरिबी रेखा वाढणे, सरकारी महसुलात लक्षणीय घट होणे अश्या गोष्टी घडून येतात. ह्या सगळ्या गोष्टींमुळे मंदीतून सावरण्यासाठी सहसा वेळ लागतो.