Financial planning after marriage : सेव्ह करो…सेव्ह करो… अशी एका बँकेची जाहिरात होती काही काळापूर्वी…
लग्नानंतर पैसे बचत करणे ही (Financial planning after marriage) अत्यावश्यक गोष्ट आहे.
कौटुंबिक भविष्यासाठी बचतीचा मार्ग सर्वात आवश्यक समजला जातो.
लग्न ठरल्यावर होणारा खर्च, लग्नात होणारा खर्च, त्यानंतर नव्या नवलाईचे काही महिने होणारा खर्च ह्या सगळ्यात बचतीचा मार्ग आधीच आखून ठेवला असेल तर भविष्यातल्या आर्थिक अडचणी कमी होतात.
जोडीने कमावणारे कुटुंब असेल तरीही बचत ही अत्यावश्यक असते.
Financial planning after marriage : काही सोप्या टिप्स ह्या लेखाद्वारे मांडण्याचा प्रयत्न
- लग्नानंतर नवरा आणि बायकोचे एकत्रित असे जॉईंट बँक अकाउंट (Joint Bank Account) उघडणे फायद्याचे.
- महिन्याला लागणारा खर्च त्या अकाउंटला जमा करून त्यातूनच घरखर्च आणि इतर मासिक खर्च भागवण्यासाठी असे अकाउंट उपयुक्त.
- एकदा का मासिक खर्चाचा अंदाज आला आणि पैसे जॉईंट अकाउंटला ट्रान्सफर केले की उरलेल्या कमाईतून सेव्हिंगसाठीची तरतूद करणे सुरु करता येते.
- वार्षिक बचतीसाठी म्हणजे वर्षातून एकदाच होणारी बचत जसेकी इन्शुरन्स प्रीमियम जर वार्षिक असेल तर त्यासाठी एक रिकरिंग अकाउंट सुरु करावे.
- हेल्थ इन्शुरन्स हा गरजेनुसार ठरवून त्यासाठीची तरतूद करावी.
- दरमहा काही रक्कम आवश्यकतेनुसार SIP किंवा पोस्टल सेव्हिंग स्कीम्स मध्ये गुंतवावी.
- काही रक्कम ही इमर्जंसी फ़ंड म्हणून बाजूला काढून ठेवावी.
ह्या टिप्स ढोबळ स्वरूपात मांडण्यात आल्या आहेत. जशी कमाई असेल त्यानुसार वरील नियोजन करणे आवश्यक ठरते.
एक सूत्र नेहमी सांगितले जाते ते म्हणजे 50-30-20 सूत्र. कमाईच्या 50% रक्कम ही नियमित गरजांवर, तर 30% रक्कम ही जे हवं आहे.
पण आवश्यक ह्या गटात मोडत नाही त्यावर खर्च आणि 20% रक्कम ही संपूर्णपणे बचतीसाठी काढून ठेवावी.
प्रत्येकाच्या भविष्यातील गरजेनुसार आणि नियोजनानुसार बचतीचा प्रकार निवडून त्यात बचत करावी.
जोडीने सेव्हिंग करा आणि भविष्य सुरक्षित करा.