What is Per Capita Income? : आपण अनेकदा टीव्ही वरील बातम्यांत किंवा वर्तमान पत्रात पाहिलं असेल की भारताचं दरडोई उत्पन्न (Per Capita Income) घटलं किंवा या अमुक-अमुक देशाचं दरडोई उत्पन्न सर्वात जास्त.
अनेकवेळा या विषयावरती अर्थतज्ज्ञ भाष्य देखील करत असतात, पण हे दरडोई उत्पन्न नेमकं काय असतं राव…?
देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी दरडोई उत्पन्नाचं महत्व काय आहे? समजावून घेऊ एकदम सोप्प्या भाषेत..
What is Per Capita Income? : दरडोई उत्पन्न म्हणजे काय?
दरडोई उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात (देश, प्रदेश, राज्य) राहण्याऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नाचे सरासरी मोजमाप होय.
What is Per Capita Income? : दरडोई उत्पन्न कसं मोजतात?
Per Capita Income मोजमाप त्या विशिष्ट क्षेत्राचे (देश, प्रदेश, राज्य) एकूण उत्पन्न व एकूण लोकसंख्या यांचा भागाकर करून काढतात.
दरडोई उत्पन्न काढताना मुख्यतः वर्षभराच्या उत्पन्नाचा विचार करतात. तसेच या उत्पन्नामध्ये प्रत्येक पुरुष, स्त्री आणि मुलाची देखील गणना समाविष्ट असते.
उदाहरण –
एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात म्हणजे आपण या क्षेत्राला एक गाव म्हणू.
राजापूर हे एक गाव आहे. या गावात साधारण 500 लोक राहतात.
या गावाचा मुख्य व्यवसाय शेती तसेच इतर व्यवसाय देखील आहे.
संपूर्ण राजापूर गाव शेती मधून आणि इतर व्यवसायातून वर्षाला दहा लाख रुपये कमावते. तर या गावाचे दरडोई उत्पन्न किती? पाहुयात…
दरडोई उत्पन्न त्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्राचे एकूण उत्पन व एकूण लोकसंख्या यांचा भागाकर करून काढतात.
उदाहणार्थ राजापूर गावाचे एकूण उत्पन्न 10 लाख ÷ गावाची एकूण लोकसंख्या 500 = राजापूर या गावाचे एकूण वार्षिक दरडोई उत्पन्न सरासरी 2000 आहे.
असाच प्रकारे संपूर्ण राष्ट्राचे राज्याचे दरडोई उत्पन्न काढले जाते. ज्या देशाचे वार्षिक दरडोई उत्पन्न जास्त आहे त्या देशाची आर्थिक स्थिती मजबूत आहे असं मानलं जात.